तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आपली फसवणूक होऊ नये यासाठी कोणते कोणते महत्त्वाचे कागदपत्रे तपासून घेण्यात यावे याबाबत आपणास माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे खरेदीखत.

मित्रांनो खरेदीखत म्हणजेच तर जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा असे मानले जाते. खरेदी खतावरच जमिनीच्या व्यवहाराच्या बद्दल पूर्ण व अचूक माहिती असते. म्हणजेच व्यवहार कधी झाला कोणाकोणाच्या मध्ये झाला किती क्षेत्रावर आणि किती रुपयांवर झाला यामधून आपल्याला स्पष्ट समजते. त्याबद्दलची सर्वत्र माहिती खरेदी खतावर असते.

जसे खरेदी खत होईल तसं पुढे माहिती फेरफार वर येते आणि नंतर सातबारा उतारा वर आणि त्यानंतर नवीन मालकाची नोंद केली जाते.

तर मग आता 1985 पासूनचे खरेदीखत आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर अगदी अल्प कालावधीमध्ये कसे पाहायचे त्याबद्दलची आपण आज संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर खरेदी खत कसे पाहिजे यासाठी सगळे सूचना नीट पळून आपण ऑनलाईन पद्धतीने मोबाईल द्वारे सहजरित्या पाहू शकतो.

सर्वप्रथम आपल्याला खरेदीखत पाण्यासाठी खाली एक लिंक दिलेली आहे ही जी लिंक आहे ती महाराष्ट्र शासनाची वेबसाईटवर घेऊन जाते. यानंतर महाराष्ट्र शासनाने नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट आपल्यासमोर ओपन होते. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस नावाचे रकना दिसेल त्या रकान्यांमध्ये तुम्हाला पहिले ऑप्शन दिसत असेल. ही सर्च नावाचे बटनावर तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे.

क्लिक केल्यानंतर 1.9 या पर्यावरणाला क्लिक करावे लागेल. इथे तुम्ही मिळकत निहाय, दस निहाय जमिनीचा रेकॉर्ड अगदी सहजरित्या पाहू शकता. त्याच्यामध्ये परत मुंबई उर्वरित महाराष्ट्राने उर्वरित महाराष्ट्र शहरी भागात तीन प्रकारांमध्ये आपले खरेदीखत अगदी सहजरित्या तुम्ही प्राप्त करू शकता.

सर्वप्रथम तुम्हाला वर्ष निवडावे लागेल आपल्याला कोणत्या वर्षांमध्ये आपल्या जमिनीचा व्यवहार झाला आहे ते पाहायचे असेल त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपले वर्ष निवडावे लागेल.

जर आपली जागा किंवा आपली शेती महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून असेल तर आपणास उर्वरित महाराष्ट्र या पर्यायाला क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर जिल्हा तहसील कार्यालय आणि आपलं गाव निवडावे लागेल.

मग आपणास मिळकत क्रमांक टाकायचा आहे. जर आपणास मिळकत क्रमांक नसेल तर आपण सर्वे नंबर किंवा गट नंबर किंवा प्लॉट नंबर पण टाकू शकता. या वेबसाईटवर आपल्याला 1985 पासून चे खरेदी खतांचा रेकॉर्ड अगदी सहजरीत्या मिळणार आहे.

नंतर पुढच्या रकाना आपल्याला कॅपच्या टाकायचा आहे जेणेकरून आपण मनुष्य आहोत हे सिद्ध होईल. म्हणजे तिथे दिसत असलेले अंक अक्षर आपल्याला जसेच्या तसे त्या रकान्यामध्ये भरायचे आहेत त्यामध्ये कोणीही चूक करू नये.

मिळकत क्रमांक टाकला की शोधा किंवा सर्च या बटणावर आपणास क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला जुने रस्त्याची संपूर्ण माहिती दिलेली असेल त्यामध्ये दस्त क्रमांक दस्त चा प्रकार म्हणजेच खरेदीखत. कोणत्या तारखेला कोणत्या कार्यालयात नोंदणी झाली तसेच जमीन देणारे घेणाऱ्यांची नावे आणि किती क्षेत्र जमीन खरेदी झाली याची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे दिसेल. त्यानंतर पुढे तुम्हाला इंटेक्स II नावाने एक पर्याय दिसेल तिथे तुम्हाला क्लिक करून तुम्ही तुमचे खरेदीखत अगदी सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता.

जर आपल्याला वरील माहिती नीट समजली नसेल आपण खाली दिलेल्या बटणावर क्लिक करू शकता युट्युब वर तुम्ही याबद्दलचा व्हिडिओ बघू शकता जेणेकरून तुम्हाला अगदी सहजरीत्या खरेदीखत कशी डाउनलोड करायचे हे समजून जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *