मे 2016 मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ग्रामीण आणि वंचित तुझी सारखं स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना सुरू केली आहे. आपण पूर्वीपासून जळाऊ लाकूड, कोळसा, शेणाच्या पोळी इत्यादींसारखे पारंपरिक स्वयंपाकांच्या इंधनांचा वापर करत आलेलो आहोत.या पारंपारिक स्वयंपाकाच्या इंधनाच्या वापरामुळे ग्रामीण महिलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झालेला आहे.
नियम व अटी
- अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असावा आणि त्याचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले असावे. अर्जदाराचे ( फक्त महिला) वय अठरा वर्ष पूर्ण झालेले असावे.
- अर्जदार हा बीपीएल कुटुंबातील महिला असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबांकडे आधीपासून कोणतेही एलपीजी कनेक्शन नसावे.
- बीपीएल कुटुंबाचे मासिक कौटुंबिक उत्पन्न हे राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी परिभाषित केल्यानुसार एका ठराविक पातळीच्या पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदाराने कोणत्याही सरकारी योजनेत समान लाभ घेतलेला नसला पाहिजे.
आवश्यक कागदपत्रे
- केवायसी फॉर्म (KYC)
- अर्जदाराचे आधार कार्ड वरील ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून अर्जदार आधार मध्ये नमूद केल्याप्रमाणे फक्त त्याच पत्त्यावर राहत असेल ( आसाम आणि मेघालयासाठी याची गरज नाही)
- ज्या राज्यातून तुम्ही अर्ज करत असाल त्या राज्याने जारी केलेलं रेशन कार्ड किंवा इतर राज्य सरकारचं कार्ड.
- स्वयंघोषणा.
- आरती आणि वयस्कर कुटुंबातील सदस्यांचा आधार दस्तऐवज क्रमांक 3.
- बँकेचे खाते क्रमांक आणि आयएफएससी (IFSC) कोड.
- कुटुंबीयांच्या स्थितीला आधार देण्यासाठी पूरक केवायसी ( KYC) असणे आवश्यक.
अर्ज करण्याची ऑफलाइन पद्धत.
उज्वला गॅस मिळवण्यासाठी तुम्हाला आम्ही खाली एक फॉर्म दिलेला आहे.तो फॉर्म तुम्ही डाऊनलोड करा फॉर्म भरून आपण नजीकच्या गॅस सुविधा केंद्रावर जाऊन तो फॉर्म तुम्हाला तिथे भरून सबमिट करायचा आहे.तिथेच तुम्हाला उज्वला गॅस कनेक्शन भेटून जाईल.
अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत
जर आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही क्लिक करा आपण ऑनलाइन अर्ज सहज पद्धतीने करू शकाल.
