▪मेष : काही प्रश्न लवकरच निकालात निघतील. तुमच्या समस्यांचे निराकरण होईल. मानसिक दृष्ट्‍या सक्षम बनाल. जवळच्या नातेवाईकाचा सल्ला मोलाचा ठरेल.
▪वृषभ : वेळेचा सदुपयोग करावा. देवाणघेवाण करताना सावध राहावे. लहान भावाला दूर गावी जावे लागेल. मनात उगाच नसत्या चिंता आणू नका.
▪मिथुन : कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल. भावंडांसोबत नवीन काम सुरू करू शकता. चर्चा सकारात्मक असेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

▪कर्क : घरातील कामासाठी थोडा वेळ काढावा लागेल. दिवस धावपळीत जाईल. एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे.
▪सिंह : प्रवासात वेळेचे भान राखावे. परोपकाराची जाणीव ठेवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल.
▪कन्या : द्विधा मनस्थितीतून बाहेर यावे. अतिविचार करणे टाळावे. अनपेक्षित लाभ मिळू शकतात. मात्र फार हुरळून जाऊ नका.

▪तूळ : कामाच्या ठिकाणी आज चांगले परिणाम पहायला मिळतील. पत्नीला खुश करता येईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. इतरांवर तुमची चांगली छाप पडेल.
▪वृश्चिक : लहान सहान गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. अभ्यासातून मन विचलीत होऊ देऊ नका. शब्दांचे वजन लक्षात घ्यावे.
▪धनू : प्रेमी युगुलांना दिवस सुखद जाईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. लॉटरी लागू शकते.

▪मकर : अति स्पष्ट बोलणे टाळावे. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. कामाचा उरक वाढवावा. आळस झटकावा लागेल.
▪कुंभ : अधिक धीटपणे काम कराल. पराक्रमाला चांगला वाव आहे. नातेसंबंधात सुधारणा होईल. तुमच्या हातातील काम पूर्ण होईल.
▪मीन : आवडते पदार्थ खाल. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करावी. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. व्यायामाला कंटाळा करू नका.

from https://ift.tt/3EUqriQ

By News

Leave a Reply

Your email address will not be published.