▪मेष : हुकुमशाहीपणा दूर सारावा. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ घ्याल. परिस्थिती अनुरूप वागणे ठेवाल. कल्पनाशक्ति योग्य वेळी वापरात आणाल.
▪वृषभ : नवीन विचार आमलात आणावेत. फार कर्मठपणे वागू नये. परोपकाराने वागाल. न्यायी दृष्टीकोन बाळगाल.
▪मिथुन : जुनी दुखणी डोके वर काढू शकतात. पारंपरिक कामात यश मिळेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
▪कर्क : नावलौकिकास पात्र व्हाल. आधुनिक विचार आमलात आणून पहावेत. कामे संथगतीने पार पडतील. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.
▪सिंह : काही गोष्टी स्थिर होण्यास वेळ द्यावा. चुकीच्या व्यक्तींमुळे मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. उगाचच विवंचना लागून राहील. संसर्गजन्य विकारांपासून सावध राहावे.
▪कन्या : नवीन गोष्टींचे ज्ञान मिळवण्याची इच्छा बाळगाल. इतरांचा विश्वास संपादन करावा. मनातील संशय दूर सारावा. चिकाटीने कामे कराल.
▪तूळ : कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढवावे लागेल. आळस बाजूला सारावा लागेल. जवळचा प्रवास जपून करावा.
▪वृश्चिक : चुकीचे निर्णय प्रयत्नाने सुधारावेत. अति महत्त्वाकांक्षा बाळगाल. भावंडांची काळजी लागून राहील. काही गोष्टींचे मनन करावे लागेल.
▪धनू : स्वकष्टावर अधिक लक्ष द्याल. काटकसरीने वागणे ठेवाल. शक्यतो मोजकेच शब्द वापरावेत. चिकाटीने कामे करून उणीव भरून काढाल.
▪मकर : स्त्रियांवरून वाद वाढू शकतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. परिस्थितीतून मार्ग काढावा. मानसिक स्थैर्य जपावे.
▪कुंभ : काही गोष्टींपासून दूर रहावेसे वाटेल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. वेळेचे बंधन पाळावे. मनातील आशा-निराशा बोलून दाखवाव्या.
▪मीन : आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. कष्टाची योग्य किंमत जाणाल. सतत धडपड करत राहाल. थोडा वेळ आपल्यासाठी देखील काढावा लागेल.

from https://ift.tt/o9PUjQr

By News

Leave a Reply

Your email address will not be published.

x