पुणे : येत्या १० मार्च नंतर राज्यात भाजपाची सत्ता येईल असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लिहिलेल्या पत्रात केंद्र सरकार महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी दबाव आणत असल्याचा दावा केला होता त्यात चंद्रकांत पाटील यांनी सत्ता स्थापनेचा नवा मुहूर्त सांगितला आहे.
राज्यात महाविकास आघाडीकडुन सत्तेचा मोठ्या प्रमाणात दुरूपयोग होत आहे. किरीट सोमय्यांवरील झालेल्या हल्यानंतर हे स्पष्ट झाल आहे. त्यामुळे या राज्यात कायदा सुव्यस्थेचा बोजवारा उडाला असुन दहा मार्चला पाच राज्यांचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात सत्ता बदल होऊन भाजपाचे सरकार सत्तेवर येईल असा दावा पाटील यांनी केला आहे.
पुण्यात महापालिका निवडणुकीनिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केले आहे. यावेळी नव्या प्रभाग रचनेवरुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादीने आपल्या राजकीय फायद्यासाठी प्रभागांची नियमबाह्य तोडफोड केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासुन नेहमी सरकार पडण्याच्या नवनवीन तारखा देत आलेले आहेत. आता त्यांनी दहा मार्च हा नवा मुहूर्त दिला आहे. पण यावेळी कार्यकर्त्यांवर मनोबल वाढवण्यासाठी हे विधान केल्याची पुस्तीही चंद्रकांत पाटलांनी जोडली आहे.

from https://ift.tt/oyQGcjd

By News

Leave a Reply

Your email address will not be published.