स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी…! 

Table of Contents

भारतीय स्टेट बँकने सर्किल बेस्ड ऑफिसर (SBO)च्या 1226 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवारांना अर्ज करण्याची मुदत 29 डिसेंबर 2021 आहे. प्रवेश पत्र 12 जानेवारी 2022 ला जारी केले जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जाऊन आपला अर्ज करू शकतात.
इच्छुक उमेदवारांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दुसऱ्या यादीत येणाऱ्या कोणत्याही व्यावसायिक बँक किंवा कोणत्याही प्रादेशिक बँकेत किमान 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे एवढी आहे. तसेच तीन फेऱ्यांमध्ये ही भरती होईल. पहिल्या फेरीत लेखी दुसऱ्या फेरीत स्क्रीनिंग आणि तिसऱ्या फेरीत मुलाखत होईल. या सगळ्यामध्ये पास झाल्यावर उमेदवाराची निवड होईल.
सर्वात अगोदर अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला भेट द्या. मुख्यपृष्ठावर दिसणाऱ्या SBI CBO भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा. त्यानंतर सर्व माहिती भरून नोंदणी करा. आयडी आणि पासवर्डसह लॉगिन करून अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट करा आणि अर्ज फी भरा. आता तुमचा अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.

from https://ift.tt/3J6HWiu

Leave a Comment

error: Content is protected !!