पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पारनेर आणि श्री निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने २३ ते २६ डिसेंबर दरम्यान चार दिवसीय राज्यस्तरीय “कृषीगंगा” प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे. या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असल्याचेही आ.लंके यांनी सांगितले.
या कृषी प्रदर्शनात दीडशे ते दोनशे कृषिविषयक दुकानं सह खाऊ गल्लीची दुकाने सहभागी होणार असून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात व्हावे माहिती व्हावी यासाठी या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहिती कारभारी पोटघन मेजर, दादा शिंदे व शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.
आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तसेच पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित सालाबादप्रमाणे या ही वर्षी कृषीगंगा भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन डिसेंबर महिन्यात करण्यात आलेले आहे. नगर जिल्ह्यात होणाच्या या अनोख्या कृषी प्रदर्शनाचे तिसरे वर्ष असून गतवर्षी कोरोना या जैविक विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता हे कृषी प्रदर्शन भरविणे शक्य नव्हते . परंतु या वर्षी पर्जन्यराजाने चांगली साथ दिल्या कारणाने व कोरोना विषाणूचा संसर्ग ही आटोक्यात आल्यामुळे यावर्षी भव्य असे कृषी प्रदर्शन भरविणे हा मानस ठेवून आमदार श्री निलेश लंके यांनी डिसेंबर महिन्यात या भव्य दिव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
नगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात होणाऱ्या या अनोख्या कृषी प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष असून गतवर्षी कृषी प्रदर्शनामध्ये उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत किमान १ लाख ७६ हजार शेतकरी बांधवांनी या कृषी प्रदर्शनाला भेट दिली होती. दोन कोटीच्यावर आर्थिक उलाढाल या प्रदर्शनात झाली होती. यावर्षी पाऊस चांगला असल्याने शेतकरी बांधवांना या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पर्वणी ठरणार आहे.
या प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भव्य स्वच्छ प्रांगण व प्रशस्त पार्किंगची सुविधा तसेच चोख सुरक्षा व्यवस्था व कंपाउंड परिसर वॉटरप्रूफ कवर्ड प्रत्येक स्टॉलला आयोजकांना मार्फत जनरल इन्शुरन्स प्रदर्शनाची सुविधा माध्यमाद्वारे प्रसिद्धी प्रत्येक स्टॉलमध्ये एक ट्यूबलाइट व नेम प्लेट जनरेटरची सोय दोन टेबल दोन खुर्च्या पिण्याच्या पाण्याची सोय वाहन कंपन्यासाठी स्वतंत्र व्यवस्था भारतातील विविध नामांकित बँड व संस्थांना प्रमुख सहभाग यात असणार आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्पादकाना थेट ग्राहकापर्यंत पोहोचवत अल्प दरात आपली उत्पादने व सेवा लाखो ग्राहकापर्यंत पोचवता येतील व शेतकरी बांधवाना ही अगदी मोफत या प्रदर्शनाचा लाभ घेता येईल या प्रदर्शनात डेअरी तंत्रज्ञान कृषी तंत्रज्ञान सोलर शासकीय योजना शेती अवजारे बी-बियाणे कुक्कुटपालन खते सिंचन पतपुरवठा हरितगृह व खाऊ गल्ली, लहानांसाठी खेळ गल्ली यासह विविध कृषी पिकासंदर्भात तज्ञ मार्गदर्शक तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल कृषी प्रदर्शन म्हणजे पारनेर नगर तालुक्यातील शेतकरी बांधवांना एक पर्वणी ठरणार असून शेती क्षेत्रातील सुधारित तंत्रज्ञान व माहिती या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल हा मानस ठेवत सदर “कृषीगंगा” राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने २३ ते २६ डिसेंबर दरम्यान चार दिवसीय राज्यस्तरीय “कृषीगंगा” प्रदर्शनाचे आयोजन केले असून या प्रदर्शनात टिकटॉक फेम दीड टन वजनाचा रेडा प्रमुख आकर्षण असणार आहे. गेल्या प्रदर्शनात भारत देशातील सर्वात बुटकी गाय या कृषी प्रदर्शनाचे आकर्षण होते. परंतु सोशल मीडियावर कोट्यवधी रुपयांची बोली असणारा दिड टन वजनाचा रेडा यंदाच्या कृषी प्रदर्शनात आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे.

from https://ift.tt/3H1V4DI

By News

Leave a Reply

Your email address will not be published.