श्री.गुरूदत्त पतसंस्थेने जपला ऐतिहासिक वारसा !

Table of Contents

टाकळी ढोकेश्वर : शहरी तसेच आदिवासी दुर्गम ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या श्री. गुरूदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेच्या सन २०२२ दिनदर्शिकेच्या माध्यमातून ऐतिहासिक,धार्मिक तसेच नैसर्गिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन श्री. गुरूदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे यांनी केले.
वासुंदे(ता.पारनेर) येथे मुख्य कार्यालय असणाऱ्या श्री. गुरूदत्त पतसंस्थेच्या सन २०२२ या नविन वर्षाच्या आकर्षक व सुबक डिझाईन मध्ये तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थापक चेअरमन बा. ठ.झावरे पाटील ,संचालक मंडळ, ग्रामस्थ व मान्यवर सभासदांच्या उपस्थित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
संस्थेचे अध्यक्ष बा.ठ.झावरे म्हणाले की,संस्थेनेअल्पावधीतच सभासदांचा विश्वास संपादन करत संस्थेच्या ठेवी ७७ कोटी ३३ लाख, तर कर्ज वाटप ६३ कोटी ७२ लाख रुपये करण्यात आले आहे.संस्थेने विविध बँकामध्ये १७ कोटी ८५ लाख इतकी सुरक्षित गुंतवणुक केली आहे. संस्थेच्या थकबाकीचे प्रमाण अत्यल्प असून संस्थेचा एकुण व्यवसाय १४१ कोटी रूपयांचा झाला आहे.
संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांसारख्याच सेवा सुविधा संस्थेच्या आठ शाखांच्या माध्यमातून अत्याधुनिक बँकिंग व अन्य आवश्यक सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे, त्यामुळे ग्राहकांमध्ये संस्थेविषयीची विश्वासहर्ता वाढण्यास या सेवांमुळे मदत होत आहे.

from https://ift.tt/315NGI3

Leave a Comment

error: Content is protected !!