मानवी देहाचा आणि मनःस्थितीचा इत्यंभूत अभ्यास माऊलींनी केलेला आहे. मनुष्याकडे मन नावाचं विमान आहे.त्याचा वेग बाह्यनिर्मितीच्या कोणत्याही साधनाला आजपर्यंत पकडता आला नाही. मन एखाद्या ठिकाणी गुंतले की त्याला तिथुन ढळवण्याचेही सामर्थ्य दुसऱ्या कुणाकडे नाही. मन दृष्यासक्त आहे. ते अदृष्यासक्त होणं मोठं कठीण आहे.हा मनाचा गुणधर्म आहे.
माऊली म्हणतात, हरि आत्मस्वरुप आहे, तसाच तो जीवात्मा आणि शिवस्वरूप आहे हे ज्ञान दृष्यजगतात वावरणाऱ्या मनाला होण्यासाठी हरिनाम हेच श्रेष्ठ साधन आहे.एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मना ॥३॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥
पण आपण पहात असलेली भक्ती किंवा करत असलेले साधन आणि भक्तीमार्ग यात हरिनाम सोडून इतर सगळं भरभरून केलं जात आहे.
कर्मकांडात अडकलेली माणसं दिसतात,कठीण व्रतं,उपवास करताना,खेट्या घालताना माणसं दिसतात.माऊली तुम्हा आम्हा सर्वांना सावध करीत आहेत.की वाया तु दुर्गमा न घाली मना।। आपण या सगळ्या पासुन मनाला हटवून हरिनामाशी जोडलं पाहिजे. अशी सावधगिरीची सुचना माऊली करीत आहेत.
सज्जनहो मनुष्य जन्माचं सार्थक हरि प्राप्त करण्यात आहे. प्रपंच होणारच आहे. त्यासाठी नको तितके आणि नको तेवढे प्रयत्न आपण करत रहातो.पण स्वतःला ओळखत नाही. मला काय हवय?माझ्यातल्या आत्मतत्वाची ओळख होण्यासाठी मी झटत नाही हे सत्य आहे. जीवाशिवाची भेट म्हणजे खरे आत्मज्ञान आहे. आपण ते मिळवण्यासाठी प्रयत्न केले तर ते देणाराची म्हणजे गुरुची भेट होईल.
माऊली म्हणतात, या उपाधीमाजी गुप्त।चैतन्य असे सर्वगत।ते तत्वज्ञ संत।स्वीकारीती।। आयुष्य अत्यंत अल्प आहे. इतर कोणतेही साधन केले तर आयुष्य कमी पडेल.जो सगळीकडे भरुन राहिला आहे त्या हरिचैतन्याला केवळ हरिनामाच्या सहाय्याने जाणता येईल.मग अवघडात पडावच का?
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3pzqRGn

By News

Leave a Reply

Your email address will not be published.