
पारनेर : अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाजाचे न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायंन्स कॉलेज पारनेर या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व माझी वसुंधरा या अभियाना अंतर्गत रायतळे येथे सात दिवशीय निवासी श्रम संस्कार शिबीर सूरू असून या शिबीरादरम्यान मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी दोन दगडी बंधारे बांधले असून मोठ्या प्रमाणात या गावची पाण्याची पातळी वाढण्यासाठी या बंधाऱ्यांचा उपयोग होईल यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले व निस्वार्थी पणाने महाविदयालयीन तरूण असे काम करतात याबद्दल गावातील नागरिकांनी कौतुक केले.
या श्रमसंस्कार शिबीराच्या माध्यमातून आपण एखाद्या गावाचं काहीतरी देणे लागतो आपण आल्यानंतर या ठिकाणी काहीतरी विधायक काम केले पाहिजे या म्हणुन या महाविद्यालयीन तरुणांनी एक आगळ्या वेगळ्या प्रकारे जलसंधारणाची मोहीम गावाच्या विकासाठी व भविष्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे अशा अनेक प्रकारचे उपक्रम शिबिर कालावधीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती राबवले जात असून निश्चितच समाजाला दिशादर्शक ठरेल अशा प्रकारचे काम हे स्वयंसेवक या ठिकाणी करत असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे .एक जल संधारण करत असताना मन संधारण होत असल्याचे दिसून येत आहे.
या शिबीरात प्रा.डॉ.अशोक घोरपडे ,प्रा. संजय आहेर , प्रा. प्रतिक्षा तनपुरे व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत
महाविदयालय शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जोपासत असताना व आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यक्तीगत किंवा सामाजिक कार्यासाठी करून दिशादर्शक काम स्वयंसेवकांनी आमच्या गावामध्ये केले निश्चित गावाच्या भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल खऱ्या अर्थाने जल संधारणाच्या माध्यमातुन गावचे मनसंधारण होईल व दिशादर्शक ठरेल
अंकुशराव रोकडे
(उपसरपंच रायतळे)
from https://ift.tt/MLBkoZ8