सुंदर आणि स्फुर्तीदायक जीवन जगु इच्छिनारांनी इकडे लक्ष द्या.पंचकोषाकडे एकदा तरी गांभिर्याने पहा असं मी वारंवार म्हणतो आहे.पहिला कोश अन्नमय आहे. कोश म्हणजे रेशीम किडा आपण पाहिला असेल,तो जसा कोश तयार करतो तसाच हा आहे. कोश म्हणजे वेस्टन,बाह्य आवरण किंवा बंदिस्त पेटी म्हटलं तरी चालेल.यातुन बाहेर पडणे म्हणजे सुटका होणे आहे.
आपण एखाद्या संकटातून बाहेर पडल्यावर जसं सुटकेचा आनंद होतो तसा आनंद या कोशावर विजय मिळवल्याने होतो.रोगमुक्त जगण्याचा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.जास्त अवघडात न पडता प्रथमावस्थेतील काही पत्थ्ये सहज जमणार आहेत. एखाद्या गोष्टीवर विजय मिळवणे म्हणजे जिंकणे होय.एखादा म्हणेल गुलाबजाम म्हणजे माझा विकपॉईंट आहे,मेथीची भाजी म्हणजे माझा विकपॉईंट आहे, चिकन,मटन म्हणजे माझा विकपॉईंट आहे. याचा अर्थ काय?तर ते पदार्थ आपल्यावर राज्य करतात.त्यामुळे ते आपण पोटभर खातो.आता कधीही कोणताही पदार्थ खाण्याइतकी सुबत्ता निर्माण झाल्याने रोगांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे हे बहुतांश लक्षात येतच नाही.
शास्रामधे पोटालाच भवसागर म्हटलं आहे. सागर जसा अथांग आहे तशीच पोटाची भुक असिमित आहे. भरल्यासारखं वाटतं पण पुन्हा जेवावच लागतं.ती जीवंत असेपर्यंत लागतेच.एक मनुष्य त्याच्या आयुष्यात किती अन्न खातो याचा हिशोब केला डोकं चक्रावून जाईल.जेवावं कसं?यावरच आपण सध्या विचार करू.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।
तोंडात घास घालताना श्रीहरीचं नाव घ्यायचं म्हणजे काय होईल? प्रसन्नता म्हणजे श्रीहरी.आपण जे अन्न खातो त्यापासुनच शरीराचं पोषण होणार आहे हे विसरु नका.निर्माण होणारे बरेचसे आजार हे अपत्थ पदार्थ खाल्याने होतात.उदाःकेळी फार आवडते पण ती नैसर्गिक रित्या पिकवली जात नाही. त्यासाठी कार्बंडायऑक्साईड नावाचा ज्वालाग्रही पदार्थ वापरला जाते त्यामुळे शरीरात उष्णता वाढुन अनेक रोग निर्माण होतात.पण हे परिणाम लगेच उद्भवत नसल्याने आजार होईपर्यंत कळत नाही. शिवाय तो कशामुळे झाला?याची कारणमीमांसा कधी होतच नाही.ऋतु आणि अन्न यांचं अतुट नातं आहे.
उन्हाळा,पावसाळा,हिवाळा आणि शाकाहार,मांसाहार यांचाही वैज्ञानिक संबंध आहे. त्यामुळे जत्रांचं आणि उपवास, व्रतांचं निर्माण झालं आहे.
आता नेमका बोध काय घ्यायचा? निरोगी रहाणं कुणाला आवडणार नाही?अन्नावर विजय मिळवायचा आहे. सतत खाण्यासाठी तोंड सज्ज ठेवण्याची क्रिया हळूहळू थांबवुन ठराविक वेळेलाच अन्न भक्षन करण्याची सवय लावुन घ्यायची आहे.
पोटभर न जेवता दैनंदिन जेवन करताना चतकोर भाकर कमी खायची आहे. सुरुवातीला हे जमणार नाही.मोह सुटणार नाही. पण आपली दिवसभरात लागणारी उर्जा आणि जेवन याचा मेळ बसवायचा आहे. खुर्चीत बसुन रहाणारांनी हे कडेकोट पाळलं पाहिजे. जादा क्यालरीचं अन्न पचवण्यासाठी आपण काय काम करता? बसून रहाणार असाल तर तुम्ही आजाराने घेरले जाणार हे निश्चित. काबाडकष्ट करणाऱ्या व्यक्तींना अन्न त्रास देत नाही. सप्तधातुमधला मेद म्हणजे चरबी वाढली की रोगांना निमंत्रण देण्याची गरज नाही. ते घरचालत येणार आहेत.
दिनचर्या कशी असावी यावर आपण उद्या बोलू.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/KPuzcNG

By News

Leave a Reply

Your email address will not be published.