“या”चार गावांचा रखडलेला पाणीप्रश्न मार्गी लागणार !

Table of Contents

शिरूर : अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिरूर तालुक्यातील कारेगाव सह इतर तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनांना तातडीने मंजुरी देण्यात यावी याबाबतचे पत्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकतेच पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव देवकर यांना दिले आहे, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रस्तावित असलेल्या या गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
शिरूर तालुक्यातील कारेगाव व केंदुर – पाबळ तसेच आंबेगाव तालुक्यातील पेठ व पोखरी या गावात नळ पाणीपुरवठा योजना जलजीवन मिशन योजने अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. सदरहू गावे टंचाईग्रस्त भागातील असून या गावातील अनेक वाड्या-वस्त्यांवर उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. तर सध्या कारेगाव याठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली असून या ठिकाणी सध्याचा पाणी पुरवठा कमी पडत आहे.
त्यामुळे या गावाने नवीन पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. हे सर्व प्रस्ताव सध्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील या गावांच्या पाणीपुरवठ्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लक्ष घालत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव देवकर यांना एक पत्र पाठवले असून या पत्रामध्ये या पाणीपुरवठा योजनांना तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी विनंती केली आहे. त्यामुळे लवकरच या गावांचा रखडलेला पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

from https://ift.tt/3pG6jdV

Leave a Comment

error: Content is protected !!