नागपूर : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूरचा गड भाजपाने राखला आहे.भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा देवूनही त्यांचा पराभव झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 तर काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराला 186 मते मिळाली तर, छोटू भोयर यांना 1 मतं मिळाले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.
नागपूरच्या जागेवर भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारीची संधी दिली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांच्या विजयासाठी केलेल्या परफेक्ट प्लॅनिंगला यश मिळाले आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाल्याचे स्पष्ट झाल्याने महाविकास आघाडीची मते फुटल्याचे समोर आले आहे.
भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेसने थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्याने भाजपने आपले नगरसेवक सहलीवर पाठवले. मतदान फुटू नये म्हणून भाजपकून सतर्कता बाळगण्यात आली होती. मात्र,मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला होता.
काँग्रेसच्या नेत्यांमध्येच उमेदवारीवरुन दोन गट पाहायला मिळाले. त्यामुळेच काँग्रेसमधील नियोजनातील गडबड भाजपच्या पथ्यावर पडली असून त्यांना भाजपच्या 318 मतांपेक्षा जास्त मिळाली आहेत.
नागपूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघ भाजपकडे होती. भाजपनं यावेळी गिरीश व्यास यांच्याऐवजी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली होती. काँग्रेसने सुरुवातीला भाजप नगरसेवक छोटू भोयर यांना फोडत आक्रमक चाल खेळली. मात्र, त्यानंतर काँग्रेस तितकी आक्रमक राहिली नाही. मतदार फुटू नये म्हणून भाजपनं मतदारांना सहलीवर पाठवलं. मतदारांना सहलीवर पाठवत मतदार एकत्रित ठेवत मतदार फुटणार नाहीत याची काळजी भाजपकडून घेण्यात आली. यानिमित्तानं भाजपने नागपूरची जागा राखली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयाने अत्यंत आनंद झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयम ठेवला त्याचे त्यांना फळ मिळाले आहे. महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकसुद्धा आता गुप्त पद्धतीने घ्यावी, म्हणजे त्यांना त्यांची ताकद कळेल. एखाद्या विषयाचा फालुदा कसा करायचा हे नागपूर काँग्रेसने दाखवून दिले आहे. आम्ही अत्यंत प्रतिष्ठेची जागा कोल्हापूरची आम्ही सोडली, त्या बदल्यात काँग्रेसने नागपूरची जागा सोडण्याचं ठरले होते. तुम्ही आम्हाला मुंबई बिनविरोध दिली. मात्र, नागपूरची जागा प्रतिष्ठेची केली. एखाद्या निवडणुकीत पोरखेळ कसा असतो हे काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने नागपूर निमित्तानं दाखवून दिले आहे.
चंद्रकांत पाटील
प्रदेशाध्यक्ष, भाजपा

from https://ift.tt/31PQIRk

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *