भगवंताला जाणण्यासाठी भजन हाच एक सोपा आहे !

Table of Contents

भगवंताला जाणण्यासाठी उकृष्ट भक्त होणं गरजेचं आहे. विभक्त नाही तो भक्त. देव आणि भक्त एक होतो तेव्हा भक्ती फळास येते.आसक्ती संपुन ज्ञान प्राप्त होते.तुकोबाराय म्हणतात, भक्त ऐसे जाणा जे देही उदास।देहाच्या संयोगाने इंद्रिये विषयसुख भोगतात.त्या देहाविषयी उदास होतो तो भक्त आहे.
नाथ महाराज म्हणतात,
न करितां भगवदभक्ती । ब्रह्मयासी नव्हे ज्ञानप्राप्ती । तेथें इतरांची कोण गती । अभजनी प्राप्ती पावावया पैं ॥५२॥
जीवाचे निरसावया अज्ञान । मुख्यत्वें असे भगवदभजन ।।
भगवतभक्तीशिवाय ब्रम्हदेवालासुद्धा ज्ञानाची प्राप्ती होत नाही. तिथं मनुष्याची काय गत आहे?जीवाचं भगवंताविषयी असलेलं अज्ञान घालवण्यासाठी भगवतभजन हाच एकमेव पर्याय आहे.इंद्रियांवर ताबा राहिला नाही की मग विकार प्रबळ होतात.त्यावर ताबा मिळवण्यासाठी पहिला रामबाण उपाय म्हणजे रामाचे नाव घेणे.
नामस्मरण,हरीभजन हेच त्याचं द्वार आहे. तिन हिस्से काम हे केवळ बाष्कळ बडबडीने बिघडते.मुखातून गेलेला शब्द वातावरणात विरुन जातो.पण ज्याला उद्देशुन तो उच्चारला आहे त्याचेकडे तो जसाच्या तसा मुर्तीमंत होऊन रहातो.मग तो शब्द वाईट असेल तर ती मुर्ती राक्षसी होते आणि शब्द चांगला असेल तर ती देवरुप धारण करते. त्यावरच येणाऱ्या प्रतिक्रिया ठरतात.म्हणजे पहिल्यांदा मुखशुद्धी आणि त्यासाठी नामस्मरण. तोंडातून अन्न घेतल्यावर जसं शरीराचं पोषण होतं.तसं मुख शुद्ध झालं की इतर इंद्रिये ताब्यात यायला सुरुवात होते.त्यासाठी भजन आहे.तो आरंभ जमला की मग आनंदीआनंद आहेच.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/3oQIUra

Leave a Comment

error: Content is protected !!