प्राथमिक शिक्षकांवरील विश्वासामुळेच शालेय गुणवत्ता साध्य पारनेर : तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभाग प्रशासनाचा प्राथमिक शिक्षकांवर असलेल्या विश्वासामुळेच शालेय गुणवत्तेचे उद्दिष्ट साध्य होत आहे. प्राथमिक शिक्षक प्रशासनाला नेहमी मदतीची भुमिका घेतात. भविष्यात देखील जेव्हा जेव्हा अडचणी येतील, तेव्हा तेव्हा संघटनेच्या माध्यमातून मदत केली जाईल, असे प्रतिपादन शिक्षक परिषदेचे राज्यनेते रावसाहेब रोहोकले गुरुजी यांनी येथे केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काल (रविवारी) गटसाधन केंद्र येथे पारनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांच्याकडे शिक्षक परिषदेचे राज्यनेते रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्या हस्ते संगणक संच देण्यात आला, त्या समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेने शिवजयंतीच्या दिवशी पारनेर पंचायत समितीमध्ये गुणगौरव समारंभ आयोजित केला होता. या गुणगौरव समारंभामध्ये अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी पारनेर तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये संगणक कमतरतेमुळे अडचणी निर्माण होतात, त्या अडचणींचा विचार करून पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक परिषद तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाला एक संगणक संच देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार संगणक संच प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे म्हणाले की, “पंचायत समितीचा शिक्षण विभाग तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सोडविले जातात. प्रशासन आणि शिक्षक यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका असल्यामुळे तालुक्याची शालेय गुणवत्ता देखील चांगली आहे. पंचायत समितीच्या अडचण लक्षात घेऊन शिक्षक परिषदेने संगणक देण्याचा निर्णय घेतला.”

यावेळेस गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी संघटनेने केलेली मदत आमच्या दृष्टीने प्रेरणादायी असून संघटनेने दिलेला शब्द आठ दिवसात पूर्ण केल्याबद्दल शिक्षक परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाच्या वतीने आभार मानले. शिक्षकांचे कोणतेही प्रश्न तालुका पातळीवर प्रलंबित राहणार नाहीत अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रम प्रसंगी विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळालेले बाळकृष्ण खोसे, दिनकर सोमवंशी, शिवाजी वाळुंज, रामदास शिंदे, पांडुरंग पवार तसेच मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळालेले कैलास ठुबे, अशोक खामकर, मंदाकिनी कावरे, गयाबाई रोहोकले, विलास पवार यांचा संघटनेच्यावतीने सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी विस्ताराधिकारी बोरुडे साहेब, नरसाळे साहेब विकास मंडळाचे सचिव मच्छिंद्र कोल्हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष खामकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील दुधाडे, मच्छिंद्र कोल्हे,अशोक गाडगे, बाळासाहेब रोहोकले, अनिल धुमाळ, संदीप फंड, शिवाजी कोरडे, संदीप झावरे, संदीप सुंबे, विनायक ठुबे, दत्तात्रय चौरे ,शिवाजी ठुबे , सर्जेराव जाधव, उत्तम धुमाळ ,प्रताप खिलारी , रविंद्र पायमोडे ,नामदेव शेरकर यांनी विशेष प्रयत्न केले. आभार गुरुमाऊली मंडळाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब धरम यांनी मानले.
शिवजयंतीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या गुणगौरव कार्यक्रमांमध्ये सभापती व गटविकास अधिकारी यांनी संघटनेच्या मागणीवरून एक संगणक संच शिक्षण विभागास देण्याचे मान्य केले असून सदरहू संच देखील याच आठवड्यामध्ये शिक्षण विभागाला हस्तांतरित केला जाईल असे सभापती गणेश शेळके व गटविकास अधिकारी किशोर माने यांनी सांगितले.
सुनील दुधाडे
तालुकाध्यक्ष शिक्षक परिषद पारनेर

from https://ift.tt/dLgmq7D

By News

Leave a Reply

Your email address will not be published.