पारनेर : पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार येथे उभ्या केलेल्या ग्रामविकासाच्या कार्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचा आपणास आनंद असल्याचे सांगत या पुढील काळातही त्यांना पद्मभूषण मिळावा अशा सदिच्छा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
पोपटराव पवार यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. यानंतर आज दिल्ली येथून परतत असताना पोपटराव पवार यांनी सपत्नीक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी पवार हे काहीसे भावनिक झाले होते.
पोपटराव पवार हे आपले सुरूवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत त्यांना तसेच राजस्थान येथील श्यामसुंदर तालेवार या यांनादेखील पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे आपल्या दोन कार्यकर्त्यांचा सन्मान झाल्याचा आनंद अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.राळेगण-सिद्धी परिवाराच्यावतीनेही पोपटराव पवार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी सरपंच जयसिंग मापारी, लाभेश औटी, सुरेश पठारे, दादा पठारे, दत्ता आवारी, संजय पठाडे, ठकाराम राऊत, सुनील हजारे, श्याम पठाडे उपस्थित होते.
पारनेर शहरात पोपटराव पवार यांचे आगमन होताच हिंद चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले. आमदार निलेश लंके यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाद्यांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात पोपटराव पवार यांची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, ॲड. राहुल झावरे, विजुभाऊ औटी,नंदकुमार औटी, डॉ. बाळासाहेब कावरे,उमाताई बोरुडे उपस्थित होते.
पारनेरचे ग्रामदैवत नागेश्वराचे ही पोपटरावांनी दर्शन घेतले.यावेळी सभापती गणेश शेळके,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, नगराध्यक्षा वर्षा नगरे, शंकर नगरे, नगरसेविका शशिकला शेरकर ,विजय डोळ, सतीश म्हस्के आदी उपस्थित होते. पत्रकार संघाच्या वतीने पोपटराव पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष शरद झावरे, माजी अध्यक्ष देविदास आबूज, उदय शेरकर, सनी सोनावळे, शशी भालेकर, लतिफ राजे उपस्थित होते.

from Parner Darshan https://ift.tt/3kqjG09

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *