बीड : प्रसिद्ध समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेईपर्यंत, त्यांच्या कीर्तनावर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी बीड जिल्ह्यातील शेतकरीपुत्राने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, असे वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी 3 नोव्हेंबर रोजी केले होते. त्यांच्या याच वक्तव्याविरोधात ही मागणी करण्यात आली.

“काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी मी लस घेणार नाही, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे जनजागृती करणाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराज जोपर्यंत लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचे कीर्तन होऊ देऊ नये,” असे बीडमधील एका शेतकरी पुत्राने म्हटले आहे. या नव्या मागणीमुळे इंदोरीकर महाराज आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

हेही वाचा  👇

▪इंदोरीकर महाराज काय म्हणाले होते ?

इंदोरीकर महाराज आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी मुलगा आणि मुलीच्या जन्मावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही, आणि घेणारही नाही असे म्हटले होते.

तीन नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमात बोलताना “कोरोना काळात शिक्षित लोकांनी चुकीचे वर्तन केले. आपल्याच घरातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या व्यक्तींना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवले. त्यांना चांगल्या ताटात जेवणं दिले नाही. त्यांच्या अंथरायच्या पांघरायच्या गोधड्या जाळल्या. त्यांच्या हाताला स्पर्श होणार नाही, इतकं फटकून त्यांच्याशी वागले. इथं हात लावू नको, तिथं हात लावू नका, अशी सगळी कोरोनाकाळात परिस्थिती होती. पण मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतंच नाही तर लस कशाला घ्यायची”, असं इंदोरीकर महाराज म्हणाले होते.

from Parner Darshan https://ift.tt/3086wy1

By News

Leave a Reply

Your email address will not be published.