
शिरूर : अलीकडच्या काळात राज्यात अनेक संकटे येऊन गेले त्यात कोरोनाचे संकटही आले मात्र, या काळात निलेश लंके यांनी केलेल्या कामाने इतिहास घडविला असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. दरम्यान, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या कार्याचेही खासदार पवार यांनी कौतुक केले.
शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या 80 वा अभिष्टचिंतन सोहळा तसेच संजय बारहाते व डॉ.दत्तात्रय जगताप यांनी लिहिलेल्या कर्मयोगी पोपटराव गावडे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शिरूर आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या वतीने टाकळी हाजी (तालुका शिरूर) येथे आयोजित करण्यात आला होता.माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या शुभहस्ते पोपटराव गावडे व त्यांच्या पत्नी जाईबाई गावडे यांचा मानपत्र गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या समारंभ प्रसंगी खा.पवार बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होते.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे , माजी मंत्री अण्णासाहेब डांगे , प्रा.राम शिंदे,खासदार अमोल कोल्हे ,आमदार अशोक पवार ,आमदार निलेश लंके ,माजी आमदार पांडुरंग अभंग ,माजी आमदार रमेश थोरात ,माजी आमदार काकासाहेब पलांडे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर ,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, युवती महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर,उद्योजक प्रकाश धारिवाल, पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, भिमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,निवृत्ती गवारी ,अरविंद ढमढेरे,पंचायत समितीचे सभापती मोनिका हरगुडे उपसभापती सविता पऱ्हाड ,जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार सुनीता गावडे ,सविता बगाटे, वैशालीताई पाटील, समितीचे सभापती काकासाहेब कोरेकर ,माजी सभापती प्रकाश पवार उपसभापती प्रवीण चोरडिया माजी सभापती शंकराव जांभळकर ,संजय काळे ,पांडुरंग पवार , कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर ,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे ,उपाध्यक्ष रंगनाथ थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी काळे ,सभापती राजेंद्र नरवडे , शरद लेंडे , सभापती देवदत्त निकम, सुरुचीचे कार्यकारी संचालक भैरवनाथ काळे, जि प सदस्य राजेंद्र जगदाळे, वर्षाताई शिवले यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की,निलेश लंके यांनी कोरोनाच्या संकट काळात केलेले काम सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या कामाचे अनेकांनी कौतुक केले, त्यांना अनेक ठिकाणी बोलावणे झाले. मी देखील त्यांचे अभिनंदन करतो अशा शब्दात खासदार शरद पवार यांनी आमदार लंके यांचे तोंड भरून कौतुक केले.
शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्याविषयी बोलताना खा. पवार म्हणाले की, पोपटरावांनी गेली ५९ वर्षे राजकारण करीत असताना समाज व पक्ष नेतृत्व यांच्याशी एकनिष्ठ राहात तत्वनिष्ठ व निष्कलंक नेतृत्व करीत शिरूर तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट केल्याने तालुक्याचे चित्र बदलले असुन त्यांचे कार्य तरुण पिढीला आदर्शवत असल्याचे पवार यांनी सांगितले.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, सक्षणा सलगर, रूपालीताई चाकणकर, आ. अशोक पवार, आ.निलेश लंके, अण्णासाहेब डांगे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी, सूत्रसंचालन निलेश पडवळ तर जिल्हा परिषद सदस्य सुनीता गावडे यांनी आभार मानले .
from https://ift.tt/3mBFNSe