राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना अब्रुनुकसानीचे दावे ठोकतात. मात्र अब्रुनुकसानी दावा म्हणजे नेमकं काय? हा दावा ठोकल्यावर नेमकं काय होतं? कायदा काय सांगतो? याबाबत सर्व काही आज जाणून घेऊयात…

अब्रुनुकसानी म्हणजे नेमकं काय? : भारतीय दंड संहितेचं कलम 499 मध्ये अब्रुनुकसानीची व्याख्या दिली आहे. त्याचा अर्थ असा आहे, की बोलण्यातून, लिहिण्यातून किंवा कोणत्याही प्रकारच्या दृश्य प्रदर्शनातून एखाद्या व्यक्तीच्या लौकिकाला बाधा पोहोचत असेल किंवा ती होतेय असं त्या व्यक्तीला वाटण्याचं कारण असेल तर त्याला अब्रुनुकसानी/मानहानी म्हटलं जातं.

अब्रुनुकसानीला नेमके अपवाद कोणते? : लोकहितासाठी सत्य, लोकसेवकांचं सार्वजनिक वर्तन, सार्वजनिक कार्यासंबंधी वर्तन, न्यायालयाच्या कार्यवाहीचा लेखाजोखा, निकाली निघालेल्या खटल्यांसंबंधी, जाहीर आविष्कारांचं मूल्यांकन, कायदेशीर अधिसत्ता असलेल्या व्यक्तीवर टीका/तक्रार, अधिकृत व्यक्तीकडे जाऊन आरोप करणे, आपले किंवा इतरांचे हितसंबंध जपण्यासाठी आरोप, सद्भावाने सूचना किंवा इशारा देणे होय.

अब्रुनुकसानीचा दावा आणि शिक्षा काय? : अब्रुनुकसानीची केस दिवाणी/ फौजदारीही असू शकते. दिवाणी खटल्यात नुकसान भरपाई दाखल दंड केला जातो. तर फौजदारी खटल्यात दंड किंवा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

from https://ift.tt/32t1qNP

By News

Leave a Reply

Your email address will not be published.