शिरूर : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमाजवळील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला मोठी गर्दी होते. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या सायंकाळपासून १ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. 

पुणे आणि मुंबईहून अहमदनगरकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीत २९ तासांसाठी बदल करण्यात आलेले आहेत. अहमदनगर-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे ती अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. यासाठी मोठा पोलिस बंदोस्तही तैनात करण्यात आला आहे.
▪अशी असेल पर्यायी वाहतूक
पुण्याहून अहमदनगरकडे जाणारी वाहतूक खराडी बायपास- केडगाव – चौफुला – न्हावरा – शिरूरमार्गे अहमदनगरकडे येईल. अहमदनगरकडून पुण्याकडे जाताना याचमार्गे वाहने जातील.
मुंबईहून अहमदनगरकडे येणारी जड वाहतूक वडगाव मावळ- चाकण- खेड- मंचर– नारायणगाव- आळेफाटा– अहमदनगर अशी येतील. अहमदनगरहून मुंबईकडे जाणाऱ्यांनाही याच रस्त्याने जावे लागेल.
मुंबईहून अहमदनगरकडे जाणारी इतर वाहने चाकण – खेड – पाबळ – शिरूरमार्गे अहमदनगरकडे येतील.
सोलापूरहून चाकणकडे जाणारी वाहतूक खराडी बायपास- विश्रांतवाडी – आळंदीमार्गे चाकण अशी जातील.

from https://ift.tt/3mHyIQi

By News

Leave a Reply

Your email address will not be published.