पारनेर : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली
त्यामुळे या ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा अद्यावत करण्यात याव्यात अन्यथा टाळे ठोकण्याचा इशारा सरपंच सौ अरुणा प्रदीप खिलारी व ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ निवडूंगे यांनी दिला आहे.
टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाला जवळपास वीस ते बावीस गावांचा संपर्क असून याठिकाणी अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे त्यामुळे या सुविधा तातडीने पुरवाव्यात अन्यथा या ग्रामीण रुग्णालयात टाळे ठोकण्याचा इशारा सरपंच खिलारी व ग्रा.पं. सदस्य निवडुंगे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. यासंबंधीची निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेले आहे.
टाकळी ढोकेश्वर गावांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण रुग्णालय कार्यरत असून येथे कोणत्याही प्रकारचे सोयी सुविधा उपलब्ध नाहीत.येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.तसेच ३० ते ३५ गावातील रूग्ण उपचारासाठी येतात. परंतु येथे रुग्णांना कोणत्याही प्रकारचे सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. तरी बाहेरील गावातील आदिवासी नागरिक आजार पणाच्या तळमळीने येत असून रुग्णांना त्यांच्या आजारावर योग्य तो उपचार होत नसल्याने रुग्णांना खाजगी ठिकाणी जाऊन उपचार घ्यावा लागतो. तसेच येथील ग्रामीण रुग्णालयाची कर्मचारी संख्या ५०% अपुरी असून येथील कर्मचाऱ्यांना वेळेत काम होत नसून गावातील लोकांची वारंवार तक्रार येते यावरती अनेक वेळा सुधारणा करण्याचा पर्यंत केला परंतु यात कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही.
ग्रामीण रुग्णालयातील परिचारीका श्रीमती गायकवाड या रूग्णांची पिळवणूक करत असून ग्रामसभेमध्ये त्यांच्या बदलीचा ठराव मंजूर झाला असून ग्रामीण रुग्णालयातील सोयी सुविधा अद्यावत करून ग्रामस्थांना योग्य तो न्याय देण्यात यावा. तसेच गावातील ग्रामीण रुग्णालयामध्ये २ हजार लिटरची पाण्याची टाकी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया विभाग, झाडे व कुंड्या सुशोभीकरण अळ्यांना वीट बांधकाम मिटींग हॉल मुतारी,संडास,वॉश बेसिंग सीटी.स्कॅन मशीन ,सोनोग्राफी मशीन, लाईट फिटिंग, स्ट्रीट लाईट, एलईडी,डिजीटल बोर्ड, कंपाउंड सहित हॉस्पिटल रंगरंगोटी, पंप,बोअर,मोटार ,नळ कनेक्शन, हिरकणी कक्ष, ऑफिस स्टॉफ, वार्ड मध्ये टी.व्ही. सुविधा अद्यावत करून इंदिरा नगर शेजारील कर्मचारी यांची राहती इमारत मोडकळीस आली असल्याने सदर इमारत ऐनवेळी पडू शकते तरी इमारत पडल्यास त्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही.
तरी या निवेदनावर १५ दिवसात कार्यवाही न झाल्यास सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपोषणास बसणार आहेत. तरी आपण येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये लक्ष घालून गावाचा प्रश्न मार्गी लावण्याची य विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून नगर येथील जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. सुवर्णमाला बांगर यांना जिल्हा शल्यचिकित्सकांनी जवळपास ८ महिन्यापासून प्रभारी म्हणून नेमणूक केलेली आहे. परंतु या ग्रामीण रुग्णालयात त्या कधीच उपस्थित नसतात अशी तक्रार सरपंच अरुणा खिलारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ निवडूंगे व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य शरद झावरे व सनी सोनावळे, डॉ. उदय बर्वे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रभारी वैद्यकीय अधिकारी न ठेवता पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावा अशी मागणीसुद्धा रुग्ण कल्याण समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.

from https://ift.tt/3ewDwTV

By News

Leave a Reply

Your email address will not be published.