
न्युक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेमध्ये नर्स, फार्मासिस्ट टेक्निशियन आणि असिस्टेंटसह विविध 72 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या तारखा…
● ऑनलाईन अर्जाची मुदत : 27 डिसेंबर 2021
● अर्ज फी जमा करण्याची मुदत : 27 डिसेंबर 2021
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा : पॅरामेडिकल आणि स्टायपेंडरी ट्रेनीसह या पदांसाठी 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार काही पदांसाठी अर्ज करू शकतात, तर काही पदांसाठी संबंधित ट्रेडमधील पदवी किंवा डिप्लोमा धारक अर्ज करू शकतात. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाले तर अर्जदारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. या पदांवरील उमेदवारांची निवड भरती परीक्षेच्या आधारे केली जाईल.
अर्ज कसा करायचा? : सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट https://npcilcareers.co.in ला भेट द्या. येथे तुम्हाला या भरतीची अधिसूचना आणि अर्ज भरण्याची लिंक मिळेल. तुम्हाला अर्ज भरण्याशी संबंधित तपशीलवार माहिती वेबसाईटवर मिळेल.
from https://ift.tt/3EGFn3U