मुंबई : यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं होतं. त्याच्या जागी रोहित शर्माची निवड करण्यात आली होती. मात्र आता एकदिवसीय सामन्याचे नेतृत्वही रोहित शर्माच करणार आहे. भारतीय संघाच्या निवड समितीने याबाबतची घोषणा केली आहे. निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची निवड केली. यामध्ये एकदिवसीय संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपवण्यात आलं आहे. तर कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन विराट कोहलीला तर कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरुन अजिंक्य रहाणेला पायउतार व्हावं लागलं आहे.  
कामाच्या दबावाचं कारण देत विराट कोहलीने टी-२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. आता कोहलीने वन डे सामन्यांचं कर्णधारपदही सोडलं आहे. तर दुसरीकडे रहाणे कसोटी सामन्यात फारसा फॉर्मात नाही. याच कारणामुळे त्याला उपकर्णधारपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. भारतीय संघ लवकरच दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथे संघ तीन कसोटी सामने तर तीन वन डे सामने खेळेल.
▪दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा
दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी लवकरच भारताचा संघ रवाना होणार आहे. या संघात कोणकोणत्या खेळाडूंचा समावेश असेल याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र आता निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता संपली आहे. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा यांच्याबद्दल दीर्घ चर्चा केल्यानंतर अखेर निवड समितीने या तिघांनाही एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या कसोटी सामन्यांसाठी अजिंक्य रहाणे नव्हे तर रोहित शर्मा उपकर्णधारपद सांभाळणार आहे.
▪’हे’ खेळाडू संघात असतील.
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के.एल.राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रिद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
▪राखीव खेळाडू
नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर, अर्जुन नागवासवाला

from https://ift.tt/3oBp5DW

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *