
शिरूर : शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपली जुनी गाडी बदलून नवी गाडी घेतली त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली मात्र खासदार कोल्हे यांनी आपण हीच गाडी का घेतली याचे स्पष्टीकरण एका व्हिडिओच्या माध्यमातून दिले अन् प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून आली.
खासदार कोल्हे यांनी टाटा मोटार्स कंपनीची टाटा हैरियर ही कार खरेदी केली आहे. ही कार खरेदी करण्यामागचं कारणही त्यांनी ‘अमोल अनमोल’ व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय. कोविड 19 महामारीच्या काळात देशातील एका मोठ्या उद्योग समुहाने देशासाठी हजारो कोटी रुपयांची मदत दिली. नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा हा उद्योग समूह कोविड काळातही प्रकर्षाने उठून दिसला, तो उद्योग समूह म्हणजे अर्थात टाटा ग्रुप. त्यामुळेच मी टाटा हैरियर ही कार खरेदी केली.
त्यासोबच, माझ्या वैयक्तिक जीवनातही टाटा ग्रुपचा मोठा वाटा राहिला आहे, त्यामुळेच मी टाटा कंपनीचा कार खरेदी केल्याचं कोल्हेंनी सांगितलं.
रतन टाटा स्कॉलरशीपचा माझ्या शैक्षणिक प्रवासात मोठा वाटा राहिला आहे. टाटा उद्योग समूह देशहितासाठी, सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी सातत्याने अग्रभागी असतो. त्यामुळेच, या उद्योग समुहाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी टाटा हैरियर ही कार खरेदी केली.
रतन टाटा हे देशाची प्रेरणा आहेत, देशातील प्रत्येक नागरिकाची ते प्रेरणा आहेत, देशाला आपला अभिमान आहे, असेही कोल्हे यांनी म्हटले. मला अभिमान आहे, टाटा ग्रुपचा ज्यांनी वर्ल्ड क्लास प्रोडक्ट बनवला. त्या वर्ल्ड क्लास प्रोडक्टचा मी ग्राहक बनलोय. मी आज लोकलचा व्होकल झालोय, असेही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
from https://ift.tt/3IVEA1M