ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत आहेत त्याला गुन्हेगार आणि आपणही तितकेच जबाबदार असतो. आत तुम्ही म्हणाल, आमचं काय चुकलं? तर अँड्रॉईड फोन वापरताना आपण अशा गोष्टी करायचे विसरतो ज्याचा फायदे हे गुन्हेगार घेतात. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी पुढील चुका टाळाच…
● अँड्रॉईड फोन वापरत असाल तर तुम्ही काय डाउनलोड करता? कोणत्या अ‍ॅप्सना अ‍ॅक्सेस देता? हे पाहणं महत्वाचं आहे. कारण यामुळे स्कॅमर्सचं काम आणखीन सोपं होतं.
● कोणतंही अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याच्या अटी आणि शर्थी वाचून घ्या. तसेच कोणत्या परवानग्या लागणार आहेत? याची माहिती घ्या. काही अ‍ॅप्स गरज नसताना देखील खाजगी डेटा अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी मागतात. अशावेळी या अ‍ॅप्सचे रिव्युज देखील बरीच माहिती देऊ शकतात.
● ब्लॉटवेयर म्हणजे हे असे अ‍ॅप्स असतात जे तुमच्या स्मार्टफोनवर आधीपासून असतात, ते अनइन्स्टॉल केले तरी फोनवर परिणाम होत नाही. हे अ‍ॅप्स जागा तर घेतात तसेच जाहिराती दाखवून तुमचा डेटा देखील चोरतात. त्यामुळे नवीन अँड्रॉइड फोन घेतल्यावर अशा अ‍ॅप्सना काढून टाका.
● कितीही लोकप्रिय अ‍ॅप्स असले तरी त्यांची APK फाईल इन्स्टॉल करू नका. तुम्हाला हवे असेलेले अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करा. जे अ‍ॅप्स प्ले स्टोरवर उपलब्ध नाहीत असे अ‍ॅप्स इन्स्टॉल करणं म्हणजे मोठी रिस्क घेणं आहे.
● हल्ली फोन चोरणारे फक्त फोन विकण्यासाठी नव्हे तर तर तुमचा डेटा चोरण्यासाठी चोरी करतात. त्यामुळे फोनला लॉक करणं आणि Google ची find device service ऑन करणं अतिशय महत्वाचं आहे.
● थर्ड पार्टी अ‍ॅप्सना अ‍ॅप इन्स्टॉल करण्याची परवानगी देऊ नका. हे अ‍ॅप्स तुमच्या नकळत फोनवर अ‍ॅप इन्स्टॉल करू शकतात. त्यामुळे सेटिंगमध्ये जाऊन ही परवानगी रद्द करा.
● अँड्रॉइडच्या सेटिंगमध्ये जाऊन अ‍ॅप मॅनेजमेंटमधील यादी बघा आणि जे अ‍ॅप्स तुम्ही स्वतःहून इन्स्टॉल केले नाहीत ते काढून टाका.
● गुगल अकॉउंटचा पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा. दुसऱ्या वेबसाईटवर वापरलेला पासवर्ड गुगल अकॉउंटसाठी वापरणं टाळा.
● जे अ‍ॅप्स तुम्ही वापरत नाही ते अनइन्स्टॉल करा. कारण हे अ‍ॅप्स फक्त मेमरी खात नाहीत तर मालवेयर देखील आकर्षित करू शकतात.

from https://ift.tt/3F6N0B9

By News

Leave a Reply

Your email address will not be published.