
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत जे कर्मचारी कामावर येतील त्यांना कामावर घेतलं जाईल, त्यांचे निलंबन मागे घेतलं जाईल, असे अनिल परब यांनी म्हटले आहे. जे कर्मचारी कामावर आले आहेत, त्यांना वेतनवाढ दिली आहे. जे कामावर येतील त्यांनाही वेतनवाढ दिली जाईल, असेही अनिल परब म्हणाले.
परब म्हणाले की, सोमवारपर्यंत जे कर्मचारी कामाला येतील त्यांना कामावर घेतले जाणार आहे. त्यानंतर निलंबनाची कारवाई केली जाईल. निलंबित कामगार यांनी ही कामावर यावं. त्यांना ही संधी दिली जाईल.जर कुणाला अडवण्यात आले तर त्यांना पोलीस संरक्षण देणार असल्याचेही परब यांनी सांगितले.
सोमवारपर्यंत आम्ही मेस्मा लावणार नाही. 2018 च्या नियमानुसार एस.टी. ही अत्यावश्यक सेवेत येत आहे. त्यामुळे मेस्माची कारवाई केली आणि करता येते, असे सांगत परब म्हणाले की, माणुसकीच्या दृष्टीने विचार करुन कामगारांना संधी दिली जाईल. आतापर्यंत एसटीचं 550 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असेही परब यांनी सांगितले.
from https://ift.tt/3oKY9lj