मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी,काँग्रेसने एकजूट होत राज्यात महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे नेते आघाडी सरकार पडेल असे वक्तव्य सातत्याने करत असतात. विरोधकांच्या या टीकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत प्रत्युत्तर दिले आहे.

विरोधकांनी ठाकरे सरकार पडण्याची काळजी करु नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार पाच नाही तर पंचवीस वर्षे पूर्ण करेल, असा विश्वासही खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे कारवाईचा ससेमिरा लावला आहे. यानंतर भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी आम्ही भाजपमध्ये आहोत त्यामुळे ईडी आमच्याकडे फिरकणारही नाही, असे वक्तव्य केले होते. इतकेच नाही तर केंद्रीय मंत्र्याने तर आमच्याकडे दोषमुक्त करण्याची जादूची पावडर आहे, असे म्हटले होते.यावरून सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला .तुम्ही भाजपमध्ये असाल किंवा भाजपसोबत असाल तर तुम्ही सुरक्षित आहात असा याचा अर्थ होतो.मात्र तुम्ही कितीही प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला घाबरणार नाही, अशा शब्दात सुळे यांनी विरोधकांना ठणकावले आहे.

ठाकरे सरकार पाडण्यासाठी विरोधकांकडून केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात आहे. अनिल देशमुख यांच्या संपत्तीवर एका वर्षात सात वेळा ईडीने धाडी टाकल्या. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंसह राज्यातील अनेक नेत्यांवर आणि मंत्र्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावत त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. केवळ नेते नाही तर त्यांच्या कुटुंबीयांनाही यात फसविले जात आहे. मात्र शेवटी चौकशीतून काहीच समोर येत नाही, असेही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांच्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करु, असे स्वप्नही केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी पाहू नये, असा टोला राऊत यांनी लगावला.

बिहार निवडणूकांवेळी अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन विरोधकांकडून महाराष्ट्राला बदनाम करण्यात आले. आता आर्यन खान प्रकरणातही तेच पाहायला मिळाले. ईडीच्या माध्यमातून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना त्रास दिला जात आहे. मात्र महाराष्ट्रातील सरकार याला भीक घालत नाही, अशा शब्दांत राऊत यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहे.

from https://ift.tt/3pFVY1E

By News

Leave a Reply

Your email address will not be published.