मित्रांनो..हे जीवन खुप सुंदर आहे.. खुप काही देणारं आणि घेणारेही आहे. इथे कोणी श्रीमंत आहे तर कोणी कष्टकरी ही.. कोणी हुशार तर कोणी अडाणी.. या जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष तर प्रत्येक जण आपापल्या परीने करत असतो. कधी खुप यश मिळतं तर कधी काय झालं..हेच समजत नाही.. खुप नुकसान वाट्याला येत. पण खरं म्हणजे हा संघर्ष ही जगण्याची धडपड, पुढे जाण्याची उर्मी हेच तर जीवन आहे.

काही जण असेही आहेत की ते स्वतःच स्वतःचे जीवन आनंदमय करु शकतात, त्यांनी स्वतः ला ओळखलेले असते..मेहनत, जिद्द चिकाटी आणि परिश्रमास ते अजिबात मागे राहत नाहीत..आणि पुढे येणाऱ्या सुख, दु:खाचाही विचार करत नाही..मी जसे कर्म केले तसे मला मिळणार यावर ते ठाम असतात.. या प्रकारचे लोक खरं जीवन जगतात यांना पहिला सलाम.. यांनी कुठेही ज्योतिष, वास्तू, अंक शास्त्र पहाण्याची गरजच नाही. कारण एकदा समजलं की मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार तर मग बाकी सर्व गौणच ठरतं..
नेमके हेच गणित समाजातील बऱ्याच जणांना माहीत असतं पण ते सत्यात कसं उतरावे हे कळत नाही.

खुप मेहनत, संघर्ष करतात पण अपयशाचे धनी होतात. मग यां प्रकारच्या लोकांना पुन्हा नव्याने जिद्द निर्माण करुण देणारं आणि यशस्वी होण्यासाठी मदत करणारं म्हणून न्युमरोलाॅजी (अंकशास्त्र) कार्य करतं. भारताचं हे शास्त्र बाहेरच्या देशात खुप मोठी भुमिका बजावताना दिसत आहे. या मध्ये अंक ग्रहांच्या भुमिका बजावतात तर आपले नाव , दुकानाचे नाव त्यांचे इंग्रजी स्पेलिंग मधील अक्षरांना एक किंमत असते. आपली जन्म तारीख आपण स्वतः निर्माण करत नाही ती आपोआपच आपल्याला मिळते या तारखेत असणारे अंक आपले जीवन घडवतात असे अंकशास्त्र सांगते.
जेव्हा तुम्ही खुप अडचणीत असता, आपला व्यवसाय चालत नाही, पैसे मिळत नाहीत, लोन मंजूर होत नाही, बायको नांदत नाही किंवा मुल होत नाही, शिक्षणात यश नाही, स्वतः चे घर होतं नाही असे नानाविध प्रश्नांची उत्तरे या अंकशास्त्र आपल्याला देवू शकते..आपण आपल्या नावात थोडे बदल करून यशस्वी होण्यासाठी उभे राहू शकता. अगदी आपला घर नंबर, आपला मोबाईल नंबर यात असणारे नंबर चार परिणाम नकळत आपण भोगत असतात.

काही नंबर इतके सुंदर आपोआपच आपल्याला मिळतात की आपण जिथे हात लावाल तिथे सोनं होतं तर काहींना असे नंबर मिळतात की जीव कासावीस होवून जातो. या अंकशास्त्राप्रमाणे आपण आपले नाव, पत्ता, गाडी नंबर, मोबाईल नंबर, व्यवसायाचे नाव चेक करुन घेवू शकता. मी गेली ३२ वर्षांपासून आर्टिस्ट व ग्राफिक डिझाईनर म्हणून अहमदनगर मध्ये सुपरिचित आहे, शुन्यातून सुरु करुन मीदेखील खूप परिश्रम , संघर्ष करतच जीवनाची वाटचाल करीत आहे.त्यात मागील वर्षी झालेल्या अपघातामुळे एक वर्ष मी घरी आहे. कोरोना, त्यात अपघात सर्व काही संपलं..आॅफिस बंद झालं.. मला बसून डिझाईन करणे शक्य होईना..घरात माझ्या सोबत पत्नीही अपघातात ईन्जुअर्ड, मुलगा दिव्यांग..कसं जगायचं हा विचार करत अगदी हताश झालो होतो. या वेळेचा सदुपयोग केला न्युमरोलाॅजीचा अभ्यास आॅनलाईन केला..२० वर्षांपासून श्री स्वामी समर्थ महाराज सेवेत ही माझे कार्य आहे याचबरोबर ज्योतिष मार्गदर्शन देखील करत होतोच हा अनुभव अंकशास्त्र शिक्षण घेताना खुप कामी आला. अधिकृत सर्टिफिकेट प्राप्त झाले.

मी माझ्या पासून अंकशास्त्राप्रमाणे बदल केले, जगण्याची हरवलेली जिद्द मला पुन्हा मिळाली.. मला स्वतःला खात्री आहे विश्वास असेल..खरंच तुम्ही खुप संघर्ष करत असाल तर नक्की मला संपर्क साधावा.. आपणास नक्कीच योग्य दिशा व मार्गदर्शन मिळेल. आता न्युमरोलाॅजी हे माझं नवीन प्रोफेशन आहे विशेष म्हणजे यांचा संबंध ग्राफिक डिझायनिंग वर सुद्धा आहे. पूर्वी मी कलात्मक लोगो किंवा डिझाईन बनवत होतो पण आता त्याच लोगोस नवी यशाची शक्ती प्रदान करु शकतो. नवीन इंडस्ट्री, व्यवसाय सुरू करताना नक्कीच संपर्क साधा व यशस्वी वाटचाल सुरू करा.
अंकशास्त्राप्रमाणे माझे नाव असे केले आहे.
PANDIT R KIRHAN
Graphic Designer and Numerologist
माझा पहिला मोबाईल नंबर
9822758704
मी बदललेला नंबर
9125298383
व्यवसायाचे नवीन नाव
Numerics Dezine
पुर्वीचे व्यवसायाचे नाव
Baba’s Creation
(Advt)

from https://ift.tt/3ntdq9L

By News

Leave a Reply

Your email address will not be published.