नागपूर : राज्यात होणाऱ्या आगामी निवडणूकांमध्ये आघाडी केलेले पक्ष एकत्र लढले तर फायदाच होईल मात्र,असे न झाल्यास एकटं लढू असा इशारा देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात काही महिन्यामध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. या पार्श्वभुमीवर प्रत्येकजण आपल्या पक्षाची मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. राज्यात जरी तिन्ही पक्षाचे मिळून महाविकास आघाडी सरकार असलं तरी नागपूर जिल्ह्यात मात्र परिस्थिती वेगळी दिसत आहे.
काही दिवसांपुर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणुक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी महापालिका निवडणुकांबाबत मोठं विधान केलं आहे. त्यावेळी ते नागपुरात बोलत होते.
नागपूर महानगरपालिका निवडणूकीत एकत्र लढणार का? या प्रश्नाला उत्तर देताना हे आत्ताच सांगता येणार नाही पण आघाडी केलेले पक्ष एकत्र लढले तर फायदा होईल असेही पवार म्हणाले.आगामी निवडणुकांमध्ये आघाडी केलेले पक्ष एकत्र आले तर योग्य आहे.नाही तर एकटं लढू असा इशाराच शरद पवारांनी काँग्रेस आणि शिवसेनेला दिला आहे.
या विधानावरुन आगामी महापालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढेल का अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, एसटीचा संप तुटेपर्यंत ताणू नये असं सांगत शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केले आहे.
तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या, काही प्रश्न सोडवावे लागेल. एसटी महामंडळांचं विलीगीकरण लगेच शक्य नाही असे शरद पवारांनी सांगितले.

from https://ift.tt/3HrwBZD

By News

Leave a Reply

Your email address will not be published.