शिरूर : कोरोनाचे सावट आणि त्यातही ग्राहकांची मंदी मग अशा परिस्थितीतून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांकडून निरनिराळे फंडे लढविले जात आहेत. आता हेच बघा ना ‘ जेवण करा ते ही चांदीच्या ताटात ‘ अशी जाहिरात करत शिरूरमधील एका हॉटेल व्यवसायिकाने ग्राहकांना खुली ऑफर दिली आहे.
शिरूर शहरानजीक पुणे-नगर रस्त्यावर प्रितमप्रकाश नगर येथे नक्षत्र कॉम्प्लेक्समध्ये ‘ सिल्व्हर स्पून ‘ नावाने हे नवीन हॉटेल सुरू झाले आहे. शंतनू खांडरे हे व्यावसायिक या हॉटेलचे मालक आहेत. शिरूर- हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वीच या हॉटेलचे थाटात उद्घाटन झाले. सिल्व्हर स्पून नावाप्रमाणेच याठिकाणी चक्क चांदीच्या ताटात जेवण मिळत असल्याने खवय्यांच्या उड्या न पडल्या तर नवलच.
रोज नवनवीन पदार्थांची रेलचेल या ठिकाणी असते. अंतर्गत भागात अतिशय आकर्षक सजावट आणि बसण्यासाठी आरामदायी आसन व्यवस्था. कुटुंबासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था असे हे नावीन्यपूर्ण सुसज्ज हॉटेल सध्या ग्राहकांची गर्दी खेचत आहे.
लहान मुलं नाजूक असतात त्यामुळे त्यांची शरीरातील रोग प्रतिरोधक शक्ती कमकुवत असते. ते लवकर आजारी पडतात. चांदीचा वापर केल्याने या धातूचे काही अंश जेवणातून शरीरात जातात आणि त्यामुळे मुलांची रोग प्रतिरोधक शक्ती सुदृढ होते आणि मुलं निरोगी राहतात. हा चांदीच्या ताटात जेवण देण्यामागील मुख्य उद्देश आहे, असे हॉटेल व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले.

from https://ift.tt/VG7uXg8

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *