पारनेर : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये मातृभाषा दिनानिमित्त न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पारनेर, विद्यापीठ अनुदान आयोग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मातृभाषा दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स पारनेरचे प्राचार्य बाळासाहेब करंजुले हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मराठी विभागप्रमुख डॉ. हरेश शेळके म्हणाले, मानवाच्या उत्पत्तीपासून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी माणसाने भाषेचा वापर केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते. मराठी भाषेच्या उत्पत्तीपासून मराठी भाषा इतर भाषांशी संघर्ष करत आली आहे. मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे. भाषा हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भाषेच्या माध्यमातून माणूस आपल्या भावना व्यक्त करतो. विशेषतः मातृभाषा ही भावना व्यक्त करायला सोपी असते भाषेचा कार्य मातृभाषेतूनच होत असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मातृभाषेची जोपासना केली पाहिजे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब करंजुले म्हणाले की, आपला देश बहुभाषिक देश आहे. अनेक भाषा आपल्याकडे बोलल्या जातात. जागतिकीकरणाच्या युगात मातृभाषा जपण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. हे आव्हान आपल्याला पेलता यावे म्हणून मातृभाषा दिन साजरा करणे गरजेचे आहे. त्यातूनच मातृभाषेविषयी आपल्या संस्कृती विषयी जागृती निर्माण होईल आणि ती चिरकाल टिकण्यासाठी मदत होईल. असे प्रतिपादन त्यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांना साधना युवा अंकाचे वाटप करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ दिलीप ठुबे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, कला शाखा प्रमुख डॉ. दीपक सोनटक्के यांनी मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस हा युनेस्कोने घोषित केला व २१ फेब्रुवारी रोजी तो साजरा केला जातो. आपली मातृभाषा,मातृसंस्कृती जतन करणे व पुढे नेण्याचे महत्त्वाचे आपण सतत केले पाहिजे.आपण आपली मातृभाषा बोलणे व ती टिकण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे
प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर

from https://ift.tt/MrpXJqd

By News

Leave a Reply

Your email address will not be published.