अन्नमय कोशावर विजय मिळवल्याशिवाय आत डोकावता येत नाही !

Table of Contents

आपण मागच्या वर्षी पंचकोशावर वरवरचे चिंतन केलेले आहे. आता पुढील काही भागांत आपण पंचकोशावर चिंतन करु.आपली सुरू झालेली ध्यानसाधना त्यात येणारे अडथळे यावर अनेक फोन येत आहेत.त्याची उत्तरं देताना मला विशेष आनंद वाटत आहे.मेसेंजरच्या इनबॉक्समधे अनेक मेसेज आलेले मी पाहिले.महिना,पंधरा दिवसांपूर्वी अनेक मेसेज आलेले आहेत.पण त्यासर्वांची मी क्षमा मागतो की मी मेसेंजर वापरत नसल्याने आपल्याशी संपर्क झाला नाही. आपल्या शंका मला या क्रमांकावर व्हॉट्स अप कराव्यात ही विनंती.(9145456607)
आपण पंचकोष विवरणाकडे पुन्हा एकदा वळणार आहोत याचं कारण हे की ध्यानधारणेत स्वस्थ बसता येत नाही या अनेकांच्या तक्रारी अगदी खऱ्या आहेत.लक्ष लागत नाही,श्वास ऐकता येत नाहीत या तक्रारी अगदी सामान्य आहेत.त्यासाठीच आपण पुन्हा या विषयावर नव्याने चर्चा करुया.
आता पहिल्यांदा पंचकोष समजण्यासाठी चार देहांची संकल्पना समजून घेऊ.
व्यक्तीचे चार देह :
प्रत्येक व्यक्तीला स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह असे चार देह किंवा शरीरे आहेत.
स्थूल देह : दृश्यमान म्हणजे दिसणाऱ्या शरीराला असलेले असे जीवाचे जे शरीराला स्थूल देह असे म्हणतात.तो अन्नाच्या पोषणातुन तयार होतो.
सूक्ष्म देह : सूक्ष्म शरीर किंवा याला लिंग असेही म्हणतात. यात पंचेद्रिये आणि कर्मेंद्रिये पंचवायु,बुद्धी आणि मन यांचा समावेव आहे.
कारण देह : व्यक्तीच्या बाबतीत तिचे मूळ अज्ञान हे सुषुप्ती अवस्थेतील आत्म्याची उपाधी आहे. त्यालाच कारण देह असे म्हणतात.(वेदान्तसार)
महाकारण देह : स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहांचा जो द्रष्टा आहे जो पंचकोशांपेक्षा वेगळा असतो, त्याला हे ज्ञान होते की, “तू आत्मा आहेस” ज्याला हे ज्ञात होऊ शकते, तो महाकारण देह आहे.
जीवनात स्वास्थ मिळवण्यासाठी ध्यानप्रक्रिया अपरिहार्य आहे. हे शिकु इच्छिणारांनी हे लेख वारंवार वाचावेत.सदर लेख फेसबुकवर आनंदसिंधु वृद्धाश्रम या पेजवरही उपलब्ध आहेत.
(पुढील उद्याच्या भागात)
रामकृष्णहरी

from https://ift.tt/1lLDvb0

Leave a Comment

error: Content is protected !!