पारनेर : माजी आमदार स्व. वसंतराव झावरे पाटील यांनी राजकारण करीत असताना समाजकारणाला जास्त महत्व दिले.सत्ता असताना सत्तेचा उन्माद कधी त्यांनी केला नाही.निस्पृह,निष्कलंक असे आयुष्य ते जगले.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करून ते तालुक्याचे लोकप्रतिनिधी झाले होते.स्व.झावरे पाटील हे राजकारणातील संत होते असे प्रतिपादन ज्येष्ठ किर्तनकार डाॅ.विकासानंद मिसाळ महाराज यांनी केले.
तालुक्यातील वासुंदे येथे स्व.माजी आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. मिसाळ बोलत होते.
यावेळी सुजित झावरे पाटील,सुप्रिया झावरे,सुदेश झावरे,सभापती गणेश शेळके,आझाद ठुबे,राहुल शिंदे पाटील,विश्वनाथ कोरडे, सुशिला ठुबे,अ‍ॅड बाबासाहेब खिलारी,प्रभाकर पोळ,रमेश कुलकर्णी महाराज,खंडू भूकन,अमोल साळवे,बाळासाहेब रेपाळे उपस्थित होते.
डाॅ.मिसाळ महाराज म्हणाले,स्व.झावरे यांनी राजकारणाचा वापर जनतेच्या विकासासाठी केला यामुळेच त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी होती.त्यांनी कायम लोककल्याणाला महत्व दिले.
यावेळी भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळातील संस्थेच्या निवृत्त शिक्षक सेवकांचा सेवापुर्ती सोहळा देखील संपन्न झाला.

from https://ift.tt/h0XRU9v

By News

Leave a Reply

Your email address will not be published.