
जीवनाच्या एका वळणावर चुकांमुळे झालेल्या स्थितीती जाणीव होते.काही चुका खूप वाईट वागल्याने किंवा खुपच चांगले वागल्याने झाल्याची जाणीव होते.अनेकदा हे चुकीचं आहे याची कल्पना येऊनही काहीच करता येत नाही. काही वेळा हे चुकिचच करायचं असं ठरवुन चुका होतात.पण चुका कोणत्याही स्थितीत केल्या तरी त्याचा परिणाम एकच असतो.
चुका कधीच आनंद देऊ शकत नाहीत.चुकांचा पश्चाताप होणं म्हणजे नव्याने चुका करणं थांबणं आहे.पश्चाताप म्हणजे नव्याने जीवन जगण्याची संधी. पश्चाताप म्हणजे अनुताप,केलेल्या चुकिचं प्रायश्चित्त घेण्याची इच्छा यातुनच निर्माण होते.अनुतापातुन श्रेष्ठ जीवनापर्यंत जाता येते.
तुकोबाराय म्हणतात,वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद । यांचे पूर्व शुद्ध काय आहे ॥
न व्हावी तीं जालीं कर्में नरनारी । अनुतापें हरी स्मरतां मुक्त ॥
तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी । मूळ जो उच्चारी नरक त्यासि ॥
वाल्याकोळी,विश्वमित्रा,वशिष्ठ,नारद यांचा पूर्व इतिहास दोषांकितचआहे.या सर्व श्रेष्ट मानल्या गेलेल्या व्यक्तींची पातक हरिच्या नामस्मरणानेच नाहीशी झाली आहे.
तुकोबाराय म्हणतात, पूर्वी केलेल्या पापांचा पश्चाताप होवून नामस्मरण करणाऱ्या भक्ताच्या दोषाचे जो उच्चारण करतो तो अंती नरकात जातो.
सज्जनहो आम्ही ही संतवाणी शब्दातीत केली तर वर्म कळणार नाही.त्यामागचा गुडार्थ कळाला पाहिजे. अनुतापीत झालेला हरीरुप होत असेल तर आपण त्याची निंदा करता कामा नये त्याने दुःख वाट्याला येते हे निश्चित.हरिरुप होणं म्हणजे चारित्र्यशुद्धीकडे प्रवास सुरु होणे हे मुख्य आहे हे ही लक्षात ठेवले पाहिजे.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3oJ9WAB