पुणे : येत्या 25 डिसेंबरला पिंपळगाव जोगाचे तर 1 जानेवारीला कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी दिली.
कालवा सल्लागार समितीच्या शनिवारी सिंचन भवन येथे झालेल्या बैठकीत ना.पाटील बोलत होते. सर्वांना चांगले पाणी मिळेल मात्र त्याचबरोबर पाण्याचा वापर व नियोजन काटकसरीने करण्याचे आवाहन मंत्री पाटील यांनी केले आहे.
पुण्याच्या सिंचन भवन येथे झालेल्या बैठकीसाठी पारनेर-नगरचे आमदार निलेश लंके, कर्जत-जामखेडचे आमदार रोहीत पवार, शिरूरचे आमदार अशोक पवार, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, माढ्याचे आमदार संजयमामा शिंदे, श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांच्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, अधिक्षक अभियंता सांगळे, कार्यकारी अभियंता कडूसकर, उप अभियंता सुहास साळवे, कालवा समितीचे अशासकिय सदस्य घनशाम शेलार, सुदाम पवार व देवदत्त निकम उपस्थित होते. पुणे येथे सिंचन भवनामध्ये झालेल्या मिटींगमध्ये नगर-पारनेरचे आमदार निलेश लंके, श्रीगोंदयाचे आमदार बबनराव पाचपुते हे ऑनलाईन पद्धतीने मिटींगसाठी उपस्थित होते.
यावेळी पारनेर-नगरचे आमदार निलेश लंके यांनी पिंपळगाव डावा कालव्याच्या अस्तरीकरणाचा व दुरूस्तीचा मुद्दा मांडला. तसेच शेतकऱ्यांना चांगल्या गेजने पाणी मिळावे अशी मागणी केली. पिंपळगाव जोगा कालव्याच्या 1 ते 71 कि.मी. कालव्यापैकी 1 ते 50 कि.मी. पर्यंत पुर्ण क्षमतेने पाणी येते. परंतु त्या पुढील 51 ते 71 कि.मी. कालवा क्षेत्रामध्ये पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होत नसल्याचा मुद्दा आमदार निलेश लंके यांच्या वतीने सुदाम पवार यांनी मांडला.
या 51 ते 71 कि.मी. मध्ये पारनेर तालुक्यातील गावे येतात. तसेच पिंपळगाव जोग कालव्याच्या 1 ते 50 कि.मी. अस्तरीकरणासाठी शासनाची मंजूरी असून त्यापुढील कालव्याच्या दुरूस्ती करून अस्तरीकरण लवकरात लवकर करावे असे मत मांडले. यावर मंत्री जयंत पाटील यांनी उर्वरीत कालव्याची दुरूस्ती व अस्तरीकरणाचे काम लवकरात लवकर करू असे आश्वासन दिले.

from https://ift.tt/3DoVqlF

By News

Leave a Reply

Your email address will not be published.