श्रीमंतीमध्ये भारतीय महिलाही पुरुषांच्या तुलनेत मागे नाहीत बरं. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या श्रीमंत महिलांच्या यादीवरून हे स्पष्ट दिसून येत आहे. यातील पहिल्या 10 महिला कोणत्या? जाणून घ्या…

1. सावित्री जिंदाल : या 2021 मधील सर्वात श्रीमंत भारतीय महिला आहेत. जिंदाल समूहाच्या त्या अध्यक्ष आहेत. 71 वर्षीय जिंदाल यांची संपत्ती आहे 18 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी आहे.
2. विनोद राय गुप्ता : हॅवेल्स इंडियाच्या प्रमुख गुप्त्या यांच्या 40 देशात व्यवसाय शाखा असून त्यांची संपत्ती 7.6 अब्ज डॉलर्स आहे.
3. फाल्गुनी नायर : या ब्युटीस्टार्टअप नायकाच्या संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती आहे 6.5 अब्ज डॉलर्स आहे.
4. रोशनी नादर मल्होत्रा : या एचसीएल एन्टरप्रायझेसच्या सीईओ आहेत. त्यांची संपत्ती आहे 4.9 अब्ज डॉलर्स आहे.

5. दिव्या गोकुलनाथ : या बायजू फौंडेशनच्या संस्थापक आहे. पती बायजू रवीन्द्रन यांच्यासह त्यांनी या फौंडेशनची 2011 ला स्थापना केली असून त्यांची संपत्ती आहे 4.5 अब्ज डॉलर्स एवढी आहे.
6. लीना तिवारी : फार्मा कंपनी युएसव्ही इंडियाच्या अध्यक्ष आहेत. त्यांची संपत्ती 4.4 अब्ज डॉलर्स आहे.
7. किरण शॉ मुझुमदार : बायोकोनच्या संस्थापक अध्यक्ष किरण यांची संपत्ती 3.9 अब्ज डॉलर्स एवढी आहे.

8. मल्लिका श्रीनिवासन : कृषी मशिनरी ट्रॅक्टर्स फार्म इंडिया लिमिटेड म्हणजे टीएएफईच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मल्लिका या यादीत आठव्या स्थानी असून त्यांची संपत्ती 2.89 अब्ज डॉलर्स आहे.
9. नीलिमा मोटापर्ती : डीवी लॅबॉरेटरीच्या डायरेक्टर नीलिमा यांची संपत्ती 2.4 अब्ज डॉलर्स आहे.
10. राधा वेंबू : या सॉफ्टवेअर प्रोडक्शन बनविणाऱ्या जोहो कंपनीच्या संचालक आहेत. त्यांची संपत्ती 1.8 अब्ज डॉलर्स एवढी आहे.

from https://ift.tt/3EpbLY2

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *