येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर केल्यनानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेत अनेक बदल होतील. ज्याचा सर्वसामान्यांच्या जीवनावरही याचा परिणाम होणार आहे. दरम्यान काही बँकाही त्यांचे नियम बदलणार आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात… 
SBI : बँकेने दिलेल्या माहितीनुसार, IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांदरम्यान रक्कम ट्रान्सफर केल्यास 20 रुपये + जीएसटी शुल्क आकारले जाईल.
बॅंक ऑफ बडोदा : 1 फेब्रुवारीपासून ग्राहकांना चेक अर्थात धनादेशाद्वारे पेमेंटसाठी, पॉझिटिव्ह पे सिस्टीमचा वापर करावा लागेल. हा बदल 10 लाख रुपयांवरील चेक क्लिअरन्ससाठी असेल.
PNB : जर तुमच्या खात्यात पैसे नसल्याने हप्ता किंवा गुंतवणुकीची प्रक्रिया फेल झाली तर तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागेल. सध्या दंडाची रक्कम 100 रुपये आहे.
LPG किंमत : दर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला हे दर निश्चित केले जातात. त्यामुळे यंदा एलपीजी घरगुती गॅसचे दर वाढतात की स्थिर राहतात? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

from https://ift.tt/kcFvZQ89R

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *