▪मेष : तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. लहानांमध्ये मन रमेल. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ घालवाल. दिवस व्यग्रतेत जाईल.
▪वृषभ : आवडते पुस्तक वाचाल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधाल. फायद्याकडे लक्ष द्यावे. चातुर्याने व्यवहार कराल.
▪मिथुन : धोरणीपणे वागणे ठेवाल. शिस्तीचा फार बडगा करू नये. कलेतून चांगली कमाई होईल. प्रगल्भ लिखाण कराल.
▪कर्क : भावंडांची काळजी लागून राहील. स्मरणशक्तीला जोर द्यावा लागेल. आपलेपणाची जाणीव ठेवून वागाल. अतिविचार करू नयेत.
▪सिंह : हाताखालील लोक उत्तम सहकार्य देतील. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल. बौद्धिक कामात गती येईल. विरोधकांचा जोर मावळेल.
▪कन्या : दिवस आळसात जाईल. स्वत:चा मानसिक गोंधळ उडवून घेऊ नका. पैशाचा योग्य विनिमय करावा. नसत्या गोष्टीत अडकू नका.
▪तूळ : पराक्रमाला अधिक बळ मिळेल. तुमच्या कामाच्या कक्षा रुंदावतील. भावंडांशी मतभेद संभवतात. हातात नवीन अधिकार येतील.
▪वृश्चिक : बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. हित शत्रूंवर मात करता येईल. हातातील कामात यश येईल. आर्थिक गणिते सुटतील.
▪धनू : जवळच्या प्रवासाचा योग येईल. नवीन गोष्टी जाणून घ्याल. आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करता येईल. चिंतन करण्यात वेळ घालवाल.
▪मकर : अनाठायी खर्च टाळावा. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. धार्मिक यात्रेचे आयोजन करावे. आवक-जावक यांचा मेळ घालावा.
▪कुंभ : जास्त चिकित्सा करू नका. हटवादीपणा करू नये. हजरजबाबीपणा दाखवाल. सर्व गोष्टी उत्तमरीत्या जाणून घ्याल.
▪मीन : जुगाराची आवड पूर्ण कराल. स्वतंत्र वृत्ती दर्शवाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल. घराबाहेर वावरतांना सावधानता बाळगावी.

from https://ift.tt/9HlgIuh

By News

Leave a Reply

Your email address will not be published.

x