▪मेष : आजचा दिवस चांगला जाईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. 
▪वृषभ : व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी. आरोग्यात सुधारणा संभवते. सरकारी कर्मचार्‍यांचे मतभेद होऊ शकतात.
▪मिथुन : लाभदायक दिवस आहे. नवीन संधी दार ठोठावेल. उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका.
▪कर्क : कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. आत्ममग्न राहाल. अधिकाराचा अतिवापर टाळावा. दिवसभर कामात गर्क राहाल.
▪सिंह : अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळा कौटुंबिक सौख्याचा समतोल राखावा. कलाक्षेत्राबाबत अपेक्षित वार्ता मिळतील. हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील.
▪कन्या : समोरील गोष्टीत आनंद शोधावा. कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी. आवक आणि जावक यांचा मेळ घालावा. रागावर नियंत्रण ठेवा.
▪तूळ : कामाची दिवसभर धांदल राहील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. एखादी घटना मन विचलीत करू शकते.
▪वृश्चिक : मानसिक संतुलन राखावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. लोकांवर अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्या.
▪धनू : कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल. व्यवहारात निष्काळजीपणा करू नका. दूरदृष्टी ठेवून विचार करावा. योग्य नियोजनावर भर द्यावा.
▪मकर : जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. कामातील उत्साह वाढीस लागेल. दिवस धावपळीत जाईल. जोडीदाराच्या साथीने मनोकामना पूर्ण करा.
▪कुंभ : आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वडीलधार्‍यांचा योग्य तो मान राखावा. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. फसवणुकीपासून सावध राहावे.
▪मीन : वैचारिक समतोल साधावा. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. कामात मित्रांचा सल्ला घ्याल. अति मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

from Parner Darshan https://ift.tt/2ZWGIVs

By News

Leave a Reply

Your email address will not be published.

x