📌 आजचे 12 राशींचे राशिभविष्य

 

Table of Contents

▪मेष : कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. आपले संपर्क क्षेत्र वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
▪वृषभ : काही संधी मिळण्यासाठी वाट पहावी लागेल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. सहकारी वर्गाशी सलोखा वाढेल.
▪मिथुन : आवडते छंद जोपासले जातील. करमणुकीत अधिक काळ रमाल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. प्रेम सौख्यात वाढ होईल.

▪कर्क : घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. मानसिक चलबिचलता जाणवेल.
▪सिंह : चांगली कल्पनाशक्ती वाढीस लागेल. हातून एखादे सत्कार्य घडेल. हस्त कलेचे कौतुक केले जाईल. नातलगांशी जवळीक वाढेल.
▪कन्या : आर्थिक बाजू सुधारेल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.आपली इतरांवर छाप पडेल.

▪तूळ : प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आपल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.
▪वृश्चिक : आपली जिद्द, चिकाटी कायम ठेवावी लागेल. सूर्याची उपासना करावी. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल. मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे.
▪धनू : आर्थिक गणिते आपल्या मनाप्रमाणे घडून येतील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल उचलावे. मनोकामना पूर्ण होईल.

▪मकर : जुन्या गोष्टी आठवून खट्टू होऊ नका. मानसिक सौख्याला प्राधान्य द्यावे. आर्थिक बाजू सुधारेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका.
▪कुंभ : परोपकारी वृत्तीत वाढ होईल. चांगली संगत लाभेल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका. ऐषारामाच्या साधनांची खरेदी कराल.
▪मीन : काही गोष्टी दुर्लक्षित कराव्या लागतील. मानसिक चंचलता जाणवेल. चांगला धनलाभ संभवतो. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. हातातील कामात यश येईल.

from Parner Darshan https://ift.tt/3ovP66i

Leave a Comment

error: Content is protected !!