▪मेष : कार्यक्षेत्रात वाढीव अधिकार प्राप्त होतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. सामाजिक भान राखून वागाल.
▪वृषभ : गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. ज्येष्ठांचा सल्ला व मत उपयोगी पडेल. घरात आनंदी वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
▪मिथुन : आनंदाची अनुभूती घ्याल. कामाच्या स्वरुपात काही क्षुल्लक बदल करावे लागतील. कलेला चांगले प्रोत्साहन मिळेल. मान-सन्मान प्राप्त होतील.
▪कर्क : प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. नवीन ओळखीतून चांगला लाभ होईल. सामाजिक कामात सहभाग घ्याल. अतितिखट पदार्थ टाळा.
▪सिंह : जवळच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. टीमवर्क यशस्वीरित्या पार पाडाल. समस्यांचे निराकरण करता येईल. आरोग्याची काळजी घ्या.
▪कन्या : कोणत्याही वादात अडकू नका. वातावरण अनुकूलतेसाठी प्रयत्न करावेत. महिला सहकार्‍याकडून मदत मिळेल. आज आपले मुद्दे ठामपणे मांडा.
▪तूळ : ज्येष्ठ व्यक्तींच्या भेटीचे योग. कामातून काहीनाकाही लाभ मिळेल. कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्या. निष्काळजीपणा कमी करा.
▪वृश्चिक : एखाद्या गोष्टीत माघार घ्यावी लागू शकते. तज्ञांच्या मतावर विश्वास ठेवून काम करावे. आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडू शकाल.अतिरिक्त भर घेऊ नका.
▪धनू : कामात आपले मत विचारात घेतले जाईल. आवश्यक गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. कामाचा उरक वाढवा. मुलांकडून लाभ होतील. जुनी देणी फेडू शकाल.
▪मकर : प्रवास लाभदायक ठरतील. जुन्या मित्रांशी संवाद साधता येईल. कर्जाऊ व्यवहार टाळावेत. हुशारीने वागावे.
▪कुंभ : दिवस मजेत जाईल. अनावश्यक खर्च टाळावेत. बोलताना शब्द जपून वापरावेत. गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल.
▪मीन : संपत्तीत वृद्धी होऊ शकेल. काही कारणास्तव प्रवास करावा लागेल. कोणत्याही गोष्टीत अति घाई करू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्यावे.

from Parner Darshan https://ift.tt/3wPh1SJ

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *