▪मेष : मुलांसोबत वेळ आनंदात घालवाल. सामाजिक मान सन्मान वाढेल. व्यापार्‍यांना लाभ संभवतो. वैवाहिक समस्या दूर होतील. 
▪वृषभ : नवविवाहिताना चांगला दिवस जाईल. कुटुंबासमवेत वेळ मजेत घालवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. घरातील लोकांची मने जिंकू शकाल.
▪मिथुन : काही खर्च आवाक्याबाहेर जाऊ शकतात. प्रेमिकांसाठी सौख्यकारक दिवस. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. मुलांची काळजी घ्यावी.
▪कर्क : तुमच्या तक्रारी दूर केल्या जातील. थोरांचे मार्गदर्शन मिळेल. आवडीची भेट वस्तु मिळेल. ग्रहमानाची उत्तम साथ लाभेल.
▪सिंह : मित्रांसोबत पार्टीचे बेत आखाल. भावंडांशी मनमोकळ्या गप्पा होतील. आतताईपणे वागू नये. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल.
▪कन्या : बोलण्याने लोकांना आकर्षित करू शकाल. व्यवसायात घरातील लोकांचे सहकार्य लाभेल. सामाजिक स्तरावर चांगले परिणाम दिसतील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होतील.
▪तूळ : जुने मित्र भेटतील. दिवस मजेत घालवाल. घरगुती कामात उत्साहाने हातभार लावाल. जोडीदारासोबत खरेदीला जाल.
▪वृश्चिक : महत्त्वाची खरेदी शक्यतो टाळावी. वेळेचा सदुपयोग करावा. दूरदृष्टीकोण बाळगावा. जुनी गुंतवणूक उपयोगास येईल.
▪धनू : मौल्यवान भेटवस्तू मिळेल. वडील भावंडांची भेट होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. थोरांकडून कौतुकास पात्र व्हाल.
▪मकर : जवळचे नातेवाईकांचे आगमन होईल. दिवस आनंदात जाईल. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. व्यावसायिक लोक दिवसभर व्यस्त राहतील.
▪कुंभ : तज्ञ लोकांचा सल्ला मिळेल. विद्यार्थ्यानी महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. वडीलधार्‍यांशी मतभेद टाळा. व्यावसायिक लोक नवीन काम हाती घेऊ शकतात.
▪मीन : खाण्या-पिण्याची काळजी घ्यावी. मोहाला बळी पडू नका. मनातील साशंकता दूर करा. अचानक धनलाभाची शक्यता.

from https://ift.tt/3ofFNso

By News

Leave a Reply

Your email address will not be published.

x