▪मेष : अति विचारात गुंतून जाऊ नका. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत. मनात नसत्या चिंता निर्माण होऊ शकतात. 
▪वृषभ : मनातील आकांक्षा पूर्ण होईल. काही नवीन खरेदी केली जाईल. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वकष्टावर भर द्यावा.
▪मिथुन : वडिलांकडून मदत घेता येईल. कमिशनमध्ये लाभ होईल. आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. बँकेची कामे सुरळीत पार पडतील.
▪कर्क : आपल्या आवडत्या कामावर लक्ष द्यावे. मानसिक समाधान लाभेल. दिवस मौजमजेत घालवाल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा.
▪सिंह : धार्मिक स्थळाला भेट देता येईल. आज उधार देणे टाळावे. दानधर्म कराल. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो.
▪कन्या : भागीदाराशी सलोखा वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.. जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल.
▪तूळ : कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. परिस्थितीला नावे ठेऊ नका. उगाच चिडचिड करू नका. मनात अकारण भीती निर्माण होऊ शकते.
▪वृश्चिक : आपले आवडते छंद जोपासा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. त्यांच्या आनंदाने खुश व्हाल. कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील.
▪धनू : जवळचे नातेवाईक भेटतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मनातील चिंता दूर साराव्यात. मानसिक समाधान लाभेल.
▪मकर : मानसिक चांचल्य जाणवेल. कसलीही हार मानू नका. कामात पत्नीची साथ मिळेल. भावंडांशी सुसंवाद साधला जाईल.
▪कुंभ : जामीनकीचे व्यवहार आज टाळावेत. फसवणुकीपासून सावधानता बाळगा. मामाकडून मदत घेता येईल. चोरांपासून सावध राहावे.
▪मीन : दिवस आनंदात जाईल. प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक प्रश्न सुटेल. मुलांच्या हुशारीने हुरळून जाल. त्यांचे कोडकौतुक कराल.

from https://ift.tt/3dJlvS6

By News

Leave a Reply

Your email address will not be published.

x