▪मेष : न आवडणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराला खुश कराल. आज तुमचा चांगला प्रभाव पडेल. गोष्टी मनाप्रमाणे घडवून आणाल. 
▪वृषभ : आपल्या मतावर ठाम राहावे. आज उधारी घेणे टाळावे. आध्यात्मिक बाबतीत प्रगती कराल. मानसिक व्यग्रता टाळावी.
▪मिथुन : केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. भावंडांसोबतच्या नात्यात सुधारणा होईल. जवळचे मित्र भेटतील. गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील.
▪कर्क : सहकार्‍याला मदत कराल. घरातील कामासाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न राहील. कामाचा उरक वाढवावा.
▪सिंह : कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. आज मनात करुणा निर्माण होईल.
▪कन्या : हलका आहार घ्यावा. व्यायामाला कंटाळू नका. काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका.
▪तूळ : तुमच्या ओळखीत वाढ होईल. सर्वांशी आपुलकीने वागाल. कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा कमावता येईल.
▪वृश्चिक : आपल्या कामात स्वत:ला गुंतवून घ्याल. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. कोणाकडूनही फार अपेक्षा ठेऊ नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.
▪धनू : आजचा दिवस खेळीमेळीने घालवाल. मुलांसोबत वेळ मजेत जाईल. रेस, सट्टा यातून लाभ संभवतो. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
▪मकर : वाहन विषयक कामे पार पडतील. मनातील विचार घरातील लोकांसमोर मांडाल. स्वत:ला कामात गुंतवून घ्याल. मनातील निराशा दूर सारावी.
▪कुंभ : वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. लहान भावंडे आपल्याला मदत करतील. चौकसपणे सर्व गोष्टींकडे पहावे. प्रवासात काळजी घ्यावी.
▪मीन : व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. खाण्यापिण्याची हौस भागवाल. मनातील भावना व्यक्त कराल. सर्वांची आपुलकीने काळजी घ्याल.

from https://ift.tt/3DWB03O

By News

Leave a Reply

Your email address will not be published.

x