📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

Table of Contents

▪मेष : आज दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. चांगुलपणाने लोकांना आपलेसे कराल. स्वभावातून परोपकारी भावना व्यक्त कराल. कामातील बदल हिताचा ठरेल.
▪वृषभ : आजचा दिवस शुभ असेल. कुटुंबासोबत संस्मरणीय वेळ घालवाल. दुपार नंतर चांगली बातमी मिळेल. पाहुणे मंडळी भेटतील.
▪मिथुन : नवीन योजना आमलात आणण्याचा प्रयत्न करावा. मन प्रसन्न राहील. आपल्या मनोकामना पूर्ण होतील. दिवस काहीसा व्यस्त राहील.

▪कर्क : व्यावसायिक योजनांना गती मिळेल. भावनिक निर्णय टाळा. घरातील वातावरण चांगले राहील. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका.
▪सिंह : एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकेल. मुलांच्या जबाबदार्‍या पार पाडाल. अपचनाचे त्रास संभवतात. आपल्या बोलण्याने लोकांचे समाधान होईल.
▪कन्या : आपल्या कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. कामाचा खोळंबा होणार नाही याची काळजी घ्या. घरात मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. कामाचा व्याप वाढता राहील.

▪तूळ : शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील. मोसमी आजार त्रस्त करू शकतात. समाधानकारक आनंदी वार्ता समजतील.
▪वृश्चिक : आपल्या मनाप्रमाणे काम पूर्ण करता येईल. बोलताना तारतम्य बाळगवे. विनाकारण डोकेदुखी वाढू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे.
▪धनू : आजचा दिवस खास असेल. भौतिक सुखात वाढ होईल. काही क्षुल्लक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मानसिक समाधान लाभेल.

▪मकर : व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल.
▪कुंभ : झेपेल इतकेच काम अंगावर घ्यावे. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात चोख राहावे. मानसिक प्रसन्नता जपावी. दिवस मजेत घालवाल.
▪मीन : वैवाहिक जीवन सुखमय होईल. मनातील दूषित गोष्टींना हद्दपार करा. आपल्याच मतावर अडून राहू नका. व्यवसाय वाढीमुळे समाधान लाभेल.

from Parner Darshan https://ift.tt/3naEHxz

Leave a Comment

error: Content is protected !!