▪मेष : मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल.आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ देऊ नका. पूर्ण खात्री केल्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका.
▪वृषभ : अचानक धनलाभ संभवतो. दिवस शांततेत व्यतीत होईल. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. मुलांकडून दिलासा मिळू शकेल.
▪मिथुन : आपल्या मौल्यवान वस्तू जपून ठेवा. मुलांच्या यशाने खुश व्हाल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नातेवाईकांमध्ये टोकाची भूमिका घेऊ नका.
▪कर्क : दिवस मध्यम फलदायी असेल. आपल्याच विचारात गर्क राहाल. प्रिय व्यक्तीची भेट घेता येईल. व्यावसायिक गोष्टी काळजीपूर्वक करा.
▪सिंह : कामाचा व्याप वाढता राहील. सामाजिक संबंध जपले जातील. दिवसभरात काहीनाकाही लाभ मिळतील. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. विरोधक पराभूत होतील.
▪कन्या : कामात सहकारी मदत करतील. समाधान मिळवू शकाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदाराशी सामंजस्याने वागावे.
▪तूळ : सर्वांना गोडीने आपलेसे कराल. खर्च काही प्रमाणात वाढलेला राहील. स्व‍च्छंदीपणे सर्व गोष्टींकडे पहाल. मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल.
▪वृश्चिक : आपली चिकाटी कायम ठेवा. लपवाछपवीचा मार्ग धरू नका. अपेक्षित उत्तराने खुश व्हाल. काही कामे अडकून राहू शकतात.
▪धनू : कौटुंबिक बाबी शांतपणे हाताळा. जवळचा प्रवास कराल. आवडत्या वस्तू खरेदी करता येतील. घरातील व्यक्तींचे बोलणे मनाला लावून घेऊ नका.
▪मकर : आर्थिक स्थिती ठीक राहील. जिद्द व चिकाटी कायम ठेवावी. भावंडांशी मतभेद संभवतात. जोडीदाराच्या मताचा आदर करावा.
▪कुंभ : सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. आपले मत विचारात घेतले जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात वाद टाळावेत. दिवस आपल्या मनाजोगा घालवाल.
▪मीन : फार विचार करत बसू नका. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. प्रवासात काळजी घ्यावी. मोठ्या व्यक्तींचे सान्निध्य लाभेल. उतावीळपणा करून चालणार नाही.

from Parner Darshan https://ift.tt/3qw0ZvP

By News

Leave a Reply

Your email address will not be published.

x