▪मेष : अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल. अति तिखट पदार्थ खाऊ नका. 
▪वृषभ : प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल. जुगारात चांगली कमाई करता येऊ शकेल. वाचनातून वैचारिकता सुधारेल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल.
▪मिथुन : कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील. तत्काल निर्णयावर येऊ नका. सारासार विचारावर भर द्यावा. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल.
▪कर्क : मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल. अधिकार्‍यांवर छाप पाडता येईल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल.
▪सिंह : व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका. आवडीचे पदार्थ चाखाल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल. हातातील अधिकार वापरता येतील.
▪कन्या : दिवस शुभ ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. रुचकर भोजनाचा आनंद घ्याल. मनाजोगी खरेदी करता येईल. 
▪तूळ : सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका. पोटाचे विकार जाणवू शकतात. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल. उगाच फार काळजी करत बसू नका.
▪वृश्चिक : नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल. साहस आणि पराक्रमात वाढ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल. एखादी बहुमूल्य वस्तू मिळण्याचे संकेत मिळतील.
▪धनू : आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील. प्रलंबित येणी मिळतील. घरात कामाचा बोजा वाढेल.
▪मकर : व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. जुन्या चिंता मिटतील. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल.
▪कुंभ : नसत्या भानगडीत अडकू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये.
▪मीन : अति साहस करायला जाऊ नका. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचनाचा त्रास संभवतो.

from https://ift.tt/3euF3dm

By News

Leave a Reply

Your email address will not be published.

x