▪मेष : आपला दबदबा निर्माण कराल. इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल. सर्वांशी आपलेपणाने वागाल. नवीन मित्र जोडले जातील. 
▪वृषभ : तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जाईल. विषयाला उगाचच फाटे फोडू नका. उष्णतेचे त्रास संभवतात. जवळचे नातेवाईक भेटतील.
▪मिथुन : जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. विचारात एकसूत्रता आणावी लागेल. एकाच वेळी ढीगभर कामे अंगावर घेऊ नका. भावंडांशी सलोखा वाढेल.
▪कर्क : घरगुती वातावरणात गुंग व्हाल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होतील.तुमच्या मताचा आदर केला जाईल.
▪सिंह : जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांची काळजी लागून राहील. लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
▪कन्या : घरात काही बदल करावे लागतील. कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. स्थावरचे प्रश्न सोडवावेत. कामाच्या ठिकाणी कुशाग्र बुद्धीचा वापर कराल.
▪तूळ : वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. हाता पायास किरकोळ इजा संभवते. तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल.
▪वृश्चिक : रागावर नियंत्रण ठेवावे. कुटुंबात आपले वर्चस्व गाजवाल कर्तृत्व दाखवण्याची संधी सोडू नका. कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवावेत.
▪धनू : आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधि मिळेल. परोपकाराची जाणीव ठेवाल. धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. वडिलोपार्जित कामे निघतील.
▪मकर : बोलण्याच्या भारात जबाबदारी घेण्याचे टाळावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. सामुदायिक वादात सहभाग घेऊ नये. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल.
▪कुंभ : वडीलधार्‍यांचा सन्मान करावा. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. हातातील कलेसाठी वेळ काढावा. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा.
▪मीन : खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. नातेवाईकांची मदत घेता येईल. सहकार्‍यांच्या साथीत रमून जाल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल.

from https://ift.tt/pvnGrMD

By News

Leave a Reply

Your email address will not be published.

x