📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

Table of Contents

▪मेष : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. विषय वासना वाढू शकते. हौसेचे मोल लक्षात घ्याल. समोरील प्रत्येक गोष्टीत रस घ्याल.
▪वृषभ : बुद्धिकौशल्याने कामे करण्याकडे कल राहील. उपासनेसाठी वेळ काढावा. खिलाडु वृत्तीने वागाल. मित्रांशी पैज लावाल.
▪मिथुन : समोरील सर्व गोष्टीत आनंद मानाल. घरगुती कामे सुरळीत पार पडतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. बागबगीच्याच्या कामात गुंग व्हाल.

▪कर्क : साहित्य प्रेम दर्शवाल. भावंडांच्या सहवासात जुन्या आठवणीत रमाल. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. जास्त चौकसपणा दाखवाल.
▪सिंह : कचेरीच्या कामात वेळ लागू शकतो. सामाजिक संबंध जपावेत. पत्नीशी मनमोकळ्या गप्पा माराल. भागीदारीच्या कामात काही नवीन बदल करावेत.
▪कन्या : काही कामे फार कष्ट न घेता पार पडतील. स्वत:चे म्हणणे खरे कराल. इतरांबद्दल मत बनवण्याआधी सारासार विचार करावा. घरगुती प्रसंग शांतपणे हाताळावेत.

▪तूळ : हातातील अधिकाराची जाणीव ठेवावी. आर्थिक उलाढाल सावधगिरीने करावी. उगाचच नसत्या काळज्या करत बसाल. ध्यानधारणा करण्याकडे लक्ष द्यावे.
▪वृश्चिक : वरिष्ठांना खुश करता येईल. व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने समाधानी राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल.
▪धनू : राग आवरता घ्यावा लागेल. कोणतेही धाडस करतांना सावधानता बाळगावी. प्रवासात काळजी घ्यावी. जबाबदारी लक्षात घेऊन वागावे.

▪मकर : थोर व्यक्तींविषयी आदर व्यक्त कराल. क्षमाशीलतेने वागाल. तात्विक विचार मांडाल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळवाल.
▪कुंभ : मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. इतरांच्या मताचा विचार करावा. योग्य संधीची वाट पाहावी. बौद्धिक ताण जाणवेल.
▪मीन : कामात उर्जितावस्था येईल. वैचारिक सुसूत्रता ठेवावी. जोडीदाराचा हट्ट पूर्ण कराल. तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जाईल.

from https://ift.tt/VuD4mTB

Leave a Comment

error: Content is protected !!