▪मेष : कामाचे योग्य नियोजन कराल. जोडीदाराच्या साथीत रमून जाल. इतरांना सहृदयतेने मदत कराल. गप्पिष्ट लोकांच्यात वावराल.
▪वृषभ : योग्य कल्पकता दाखवाल. लेखक, प्राध्यापक यांना प्रगती करता येईल. व्यवहारी हजरजबाबीपणा दाखवाल. हुशारीने स्वत:च फायदा काढून घ्याल.
▪मिथुन : प्रवासाची आवड पूर्ण कराल. तुमच्या वक्तृत्वावर लोक खुश होतील. धोरणीपणे वागणे ठेवाल. काही गोष्टींची शिस्त बाळगावी लागेल.
▪कर्क : कफाचे त्रास संभवतात. अति विचारात वेळ वाया जाईल. योग्य अनुमान काढावे. मेंदूला जरासा ताण द्यावा लागेल.
▪सिंह : विरोधकांवर मात करता येईल. जोडीदाराच्या सुस्वभावीपणाचे कौतुक कराल. मानसिक स्थिरता जपावी. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.
▪कन्या : जुनी भांडणे उकरून काढली जातील. कोणाचाही सल्ला चटकन मान्य करू नका. अविचाराने त्रास वाढू शकतो. इतरांच्या विश्वासास पात्र व्हावे.

▪तूळ : घरगुती शांतता जपावी. प्रवास त्रासदायक ठरू शकतो. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. खोट्या गोष्टींचा विरोध करावा.
▪वृश्चिक : तुमच्यातील प्रेमळपणा दाखवून द्यावा. भावंडांचे वागणे विरोधी वाटू शकते. नवीन मित्र जोडले जातील. जवळचे नातेवाईक भेटतील.
▪धनू : काही खर्च आटोक्यात ठेवावेत. वैचारिक चलाखी दाखवाल. नवीन गोष्टीत रुची दाखवाल. मनाची चलबिचलता सांभाळावी.
▪मकर : धार्मिक ठिकाणी मदत कराल. गैरसमजातून वाद वाढू देवू नका. बोलतांना सावधगिरी बाळगावी. कलेसाठी वेळ काढाल.
▪कुंभ : स्मरणशक्तीचा चांगला फायदा होईल. अभ्यासूपणे गोष्टी जाणून घ्याल. हसत-हसत संभाषण कराल. बुद्धि चातुर्याने वागाल.
▪मीन : बढतीचा योग येईल. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. उधारीचे व्यवहार तूर्तास टाळावेत. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

 

from https://ift.tt/0lAQKfy

By News

Leave a Reply

Your email address will not be published.

x